आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतातील खाेलीत दडवून ठेवला हाेता चाेरीचा एेवज; अाज चाैघा आरोपींची ओळखपरेड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरमालकाच्या संपत्तीवर नजर ठेवून असलेल्या मोलकरणीनेच नियोजन करून भावासह तिघांच्या मदतीने वृद्धेस बांधून जबरी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. मोलकरणीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे बटन बंद केल्यामुळे तिच्यावर सर्वप्रथम पाेलिसांचा संशय बळावला होता. त्यामुळे पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर शेतात दडवून ठेवलेला एेवज काढून दिला. 


डॉ. नरेंद्र दोशी यांच्या घरात शनिवारी दुपारी १.३० वाजता घडलेल्या या जबरी चोरीच्या नाट्यावरून रात्री ११ वाजता पडदा उठला. पोलिसांनीरात्रीतूनच चौघांना अटक केली आहे. पळासखेडे मिराचे येथील यशोदाबाई गवळी, सिधू बाळ गवळी, देवानंद प्रकाश कोळी व भरत शंकर गवळी अशी चोरट्यांची नावे आहेत.


पथकास १५ हजारांचे बक्षीस 
या गुन्ह्यात पोलिस उपअधीक्षक सांगळे यांच्यासह चार पोलिस निरीक्षक, डीबी कर्मचारी यांनी एकत्रितपणे काम करून गुन्हा उघडकीस आणला. गुन्हा घडल्यानंतर १२ तासांच्या आत चारही संशयित आरोपींना अटक केली अाहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पथकास १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले, अशी माहिती शिंदे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 

बातम्या आणखी आहेत...