आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून रॉबर्ट वढेराची 9 व्यांदा चौकशी, चौकशीला जाण्यापूर्वी वढेरा यांनी फेसबुकवर लिहिली भावनिक पोस्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी रॉबर्ट वढेरा यांची 9व्यांदा चौकशी केली. यासाठी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी पती रॉबर्ट वढेरा यांच्यासोबत ईडीच्या ऑफिसमध्ये पोहचल्या. ईडी वढेरा यांच्या अवैध संपत्ती आणि लँड डील प्रकरणाचा तापस करत आहेत. चौकशीसाठी त्यांना बुधवारी समन्स जारी करण्यात आले होते. त्यांती लंडन, एनसीआर, बीकानेरसहित इतर जागांवर खरेदी केलेल्या जमिनीच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे.

 

ईडीच्या ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी वढेरा यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीली. त्यात त्यांनी लिहीले- ''तपास यंत्रणेने आतापर्यंत मला 11 वेळेस बोलेवले आणि आतापर्यंत 70 तास चौकशी केली आहे. मला न्यायपालिकेवर विश्वास आहे. जोपर्यंत माझ्यावर लागलेले आरोप खोटे ठरत नाहीत, तोपर्यंत मी चौकशीसाठी सहयोग करत राहील." या पोस्ट सोबत त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो लावला आहे.


फेब्रुवारीमध्ये वधेरासोबत त्यांच्या आईचीदेखील चौकशी
तपास करणाऱ्या विभागाने फेब्रुवारीमध्ये वधेरा आणि त्यांच्या आईलादेखील चौकशीसाठी बोलावले होते. तेव्हा प्रियंका गांधी त्यांच्यासोबत ईडीच्या ऑफिसमध्ये आली होती. त्या म्हणाल्या होत्या, "मी माझ्या पतीच्या बाजूने आहे." तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वढेरा यांच्या नावावर लंडनमध्ये 9 अवैध संपत्या आहेत.


ईडीकडे वधेराच्या अघोषित संपत्तीचे डिटेल्स
वढेरावर लंडनच्या 12 ब्रिंस्टन स्क्वेअरमध्ये 10 लाख 90 हजार पाउंडमध्ये चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या संपत्तीचा मालक वधेरा असल्याचे समोर आले आहे. ईडीने सांगितल्यानुसार, स्कायलाइटचे कर्मचारी मनोज अरोडाची या प्रकरणात महत्त्वाची भुमिका होती. अरोडाकडे वधेराच्या अघोषित संपत्तीची संपूर्ण माहिती आहे. यासोबतच बेकायदा पैसे जमवल्याचाही आरोप आहे.


ईडीच्या वकीलाने सांगितले- वढेराला मिळालेली सुरक्षा अडथळा निर्माण करत आहे
मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने वढेराला 1 एप्रिलला सशर्त अग्रिम जामीन मिळाला होता. त्यात त्यांना ने सांगता देश न सोडने आणि चौकशीत सहयोग करण्याचे आदेश दिले होते. ईडीने वधेरा यांचा जामीन रद्द करण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावनीदरम्यान कोर्टाने सोमवारी वढेराला नोटिस जारी करून 17 जुलैपर्यंत उत्तर मागितले आहे. ईडीच्या वकीलाने आरोप लावला होता की, वढेराला मिळालेली सुरक्षा तपासात अडथळा निर्माण करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...