आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉबर्ट वढेरा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सलग दुसऱ्या दिवशी ईडी कार्यालयात, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चौकशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा परदेशातून परतल्यावर सलग दुसऱ्या ईडीच्या कार्यालयात उपस्थिती लावली. ते गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले. तत्पूर्वी बुधवारी सायंकाळी ४ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले. स्वत: प्रियंकांनी त्यांना कार्यालयाबाहेर सोडले आणि त्या थेट काँग्रेस मुख्यालयात पोहचल्या. उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीस म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. एकीकडे ईडीचे अधिकारी वढेरांच्या परदेशातील बेनामी मालमत्तेविषयी चौकशी करत होते, तर दुसरीकडे प्रियंकांनी प्रथमच उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. रॉबर्ट वढेरांची एखाद्या तपास संस्थेसमोर हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

ईडी कार्यालय : ७ अधिकाऱ्यांनी वढेरांना वकिलांच्या उपस्थितीत प्रश्न विचारले, वढेरांनी काही उत्तरे लेखीमध्ये देण्यास दिला नकार 
ईडीच्या दोन संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह सात अधिकाऱ्यांनी लंडनमधील भूखंड व बंगला खरेदीबाबत वढेरांची चौकशी केली. या प्रश्नावलीत ४२ प्रश्न होते. या प्रश्नांची लेखी उत्तरे ईडीला हवी होती. परंतु, वढेरा यांनी काही प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरूपात देण्यास नकार दिला. 


ईडी : मनोज अरोरा आणि फरार शस्त्र व्यापारी संजय भंडारीला तुम्ही ओळखता का? 
वढेरा : अरोराला ओळखतो. तो माझा कर्मचारी होता. आता नाही. भंडारीला मी ओळखत नाही. 
ईडी : अराेराच्या ई-मेलवरून तुमच्या मेलवर मालमत्ता व पैशाबाबत संवाद झाला होता. 
वढेरा : नाही... मी कधीच ई-मेल केला नाही. 
ईडी : लंडनमधील १२ ब्रायन्स्टन स्क्वेअर भागातील मालमत्ता तुमची आहे? याशिवाय तेथे दुसरी संपत्ती आहे का? 
वढेरा : लंडनमध्ये माझी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात कोणतीही संपत्ती नाही. 

 

काँग्रेस कार्यालय : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीच्या कारवाईचा अर्थ लोकांना चांगला माहिती आहे : प्रियंका 


पतीच्या चौकशीबाबत प्रियंका म्हणाल्या, 'पतीला ईडीच्या कार्यालयात सोडून प्रत्येक क्षणाला ही त्यांच्या सोबत आहे हे दाखवून देऊ इच्छित होते. निवडणुकीच्या तोंडावर हे का घडत आहे, हे लोकांना चांगले माहिती आहे.' यानंतर प्रियंकांनी पूर्व उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

 

वढेरांनी चौकशीत लंडनमधील बंगल्याचा मालक मनोज अरोरा याला ओळखले... 

लंडनमध्ये १२ ब्रायन्स्टन स्क्वेअरमधील १९ कोटींच्या मालमत्तेचे हे प्रकरण आहे. फरार शस्त्र व्यापारी संजय भंडारीच्या चौकशीत मनोज अराेराचे नाव आले होते. त्याने ही मालमत्ता भंडारीला विकली होती. मात्र, ईडीचा दावा आहे की, या मालमत्तेचे खरे मालक वढेराच आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...