आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर रॉबर्ट वढेरा यांनी शेअर केली पोस्ट, म्हणाले- ही गाय आपले भविष्य सांगते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली- भारताची विविधता आणि बहुरुपी प्रतिभेसाठी आपले प्रेम व्यक्त करताना व्यवसायीक रॉबर्ट वधेरा यांनी रविवारी एका गाईचे काही फोटोज शेअर केले. त्यासोबतच त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला, ज्यात ते भविष्य सांगणाऱ्या गाईंबद्दल सांगत आहेत. तसेच त्यांनी रस्त्यावर फिरण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल सांगितले.

 

 


त्यांनी लिहीले की, "तुम्ही रस्त्यावर जाऊन बरेच काही शिकू शकता. लोकांची मदत करा आणि त्यांची प्रशंसा करून त्याबदल्यात गुलाब मिळवा." वढेरा यांनी काही आनंदी मुलांसोबत तीन फोटोज शेअर केले. तसेच त्यांनी एका भविष्य सांगणाऱ्या गाईबद्दलही सांगितले, जी आपले तोंड हलवून भविष्य सांगते.

 

 

 


त्यांनी गाईसोबत एक व्हिडिओ टाकून लिहीले की, तुम्ही या गाईच्या मदतीने आपले भविष्य माहित करून घेऊ शकता. या अद्भुत देशाचा भाग असण्याचा मला गर्व आहे. 

बातम्या आणखी आहेत...