Home | National | Other State | Robert Vadra's 9 hours inquiry by ED 

वढेरा यांची ईडीकडून बिकानेर जिल्ह्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी दुसऱ्या दिवशीही ९ तास चौकशी 

वृत्तसंस्था | Update - Feb 14, 2019, 10:25 AM IST

ईडीने त्यांची पहिल्या दिवशी मंगळवारीही सुमारे नऊ तास चौकशी केली होती.

  • Robert Vadra's 9 hours inquiry by ED 

    जयपूर- काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जमीन घोटाळ्यात बुधवारी दुसऱ्या दिवशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नऊ तास चौकशी केली. वढेरा ईडीच्या जयपूर विभाग कार्यालयात सकाळी १०. २६ वाजता पोहोचले आणि रात्री ८.४० वाजता बाहेर पडले. यादरम्यान त्यांना जेवणासाठी एक तासाची सूट देण्यात आली. ईडीने त्यांची पहिल्या दिवशी मंगळवारीही सुमारे नऊ तास चौकशी केली होती.

    चौकशीत दिल्ली आणि जयपूर येथील ईडीचे ११ अधिकारी सहभागी आहेत. वढेरा यांच्या कंपनीने २०१२ मध्ये बिकानेर जिल्ह्याच्या कोलायतमध्ये ७९ लाख रुपयांत एकूण २७५ बिघा जमीन खरेदी केली व तीन वर्षांनी ५.१५ कोटी रुपयांत एलजेनी फिनलीज प्रा. लि. ला विकली, असा आरोप आहे.


    शारदा घोटाळ्यात राजीवकुमार यांची चौकशी पूर्ण :

    शारदा चिटफंड घोटाळ्यात सीबीआयने कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीवकुमार यांची बुधवारी पाचव्या दिवशी चौकशी पूर्ण केली. त्यानंतर सीबीआयने त्यांना कोलकात्याला जाण्यास सांगितले.

Trending