आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही महिला लोकांना मिठी मारण्याचे घेते लाखो रूपये, कारण जाणून व्हाल थक्क

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कंसास : जभरातील लोक पैसे कमविण्यासाठी वेगवेळगे पर्याय शोधून काढतात. अमेरिकेतील एका महिलेने देखील काहीसा वेगळा मार्ग शोधला आहे. ही महिला आपल्या या वेगळ्या मार्गाने दर तासाला हजारो रूपयांची कमाई करत आहे. यासाठी तिला कुठल्याही प्रकराची गुंतवणूक अथवा परिश्रम करत नाही. रोबिन मेरी असे या महिलेचे नाव आहे. ती लोकांना मिठी मारते आणि याबाबत त्यांच्याकडून शुल्काच्या रुपात मोठी रक्कम घेते.

 

कोणाला मिठी मारल्याने इतके पैसे कसे मिळू शकतात याबाबत तुमच्या मनात शंका निर्माण झाली असणार. पण हे सत्य आहे. या महिलेला लोकांना मिठी मारण्याचे प्रचंड पैसे मिळतात. यामुळे ही महिला सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली आहे. रॉबिन नेमके असे काय करते की, ज्यामुळे तिला लोकं इतके पैसे देतात याबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत.  

 

28 लाख रूपयांची वार्षिक कमाई

कंसास येथील रहिवासी रॉबिन मेरी लोकांना फक्त मिठी मारून प्रेमाने त्यांना झोपी घालते. असे करण्यासाठी ती 80 डॉलर (5,635) प्रति तास शुल्क आकारते. रॉबिन या कामद्वारे दर वर्षी 28 रूपयांची कमाई करत आहे. मेरी एक प्रोफेशनल कडलर आहे. ती आपल्या या सुविधेद्वारे लोकांना रिलॅक्स फील करवते.  

 

कामासाठी आहे काही नियम

मेरीचे म्हणणे आहे की, असे केल्याने शरीरातून ऑक्सीटोसिन हॉर्मोन रिलीज होतात. यामुळे लोकांना आनंद तर होतोच पण त्यांचा ताणही कमी होतो. मेरीचे 1 ते 4 तासांचे एक सेशन असते. पण मेरीचे यासाठी काही कठोर नियम आहेत. क्लाइंट्सला पूर्णवेळ कपड्यांमध्येच असावे, सेशन दरम्यान कोणत्याही प्रकराचा फिजिकल डिझायर सुद्धा असू नये. उन्हाळ्याच्या दिवसात ते शॉर्ट्स परिधान करू शकतात पण ते खूपच छोटे नसावेत. अशाप्रकारचे तिची नियमावली आहे. 

 

विवाहीत आणि विधवा लोक देखील येतात 

मेरी स्वतः रिलेशनशिपमध्ये आहे. पण तिच्या प्रियकराला या कामाबद्दल कोणतीही अडचण नाहीये.  आश्चर्याची बाब म्हणजे मेरीकडे सिंगल लोकांबरोबरच विवाहीत आणि विधवा लोकं देखील येतात. आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी असणारे लोकं देखील मेरीकडे येतात.

 

मेरीचे म्हणणे आहे की, माझ्या प्रियकराला या कामाबाबत माहिती आहे. पण त्याला यामुळे कोणतीही अडचण नाही. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचे सेक्शुअल अॅक्टिव्हीटी नाही. मेरीला तिच्या या कामामुळे आनंदी आहे. कारण तिलाही याचा फायदा झाला आहे. मेरीलाही आता चांगली झोप येत असून कोणत्याही प्रकारचा तणाव नाहीये. 

बातम्या आणखी आहेत...