आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Robo Chef | Robots To Serve Food At Bhubaneswar's Restaurant Robo Chef In Odisha,

पूर्व भारतातील पहिलेच रेस्तराँ; जिथे 'मेड इन इंडिया' रोबोट वाढतात जेवण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - ओडिसाची राजधानी भुवनेश्वर येथील इन्फोसिटी डीएलएफ टॉवरमध्ये बुधवारी 'रोबो शेफ' नावाचे एक रेस्तराँ सुरु झाले आहे. या रेस्तराँमध्ये भारतात तयार करण्यात आलेले दोन रोबोट ग्राहकांना जेवण वाढतात. अशाप्रकारची सुविधा देणारे हे भारतातील पहिले रेस्तराँ असल्याचा दावा रेस्तराँ मालकाने केला आहे. रेस्तराँचे मालक जीत बासा यांचे म्हणणे आहे की, हे रोबोट ग्राहकांना जेवणाचा वेगळाच अनुभव देतील. चंपा आणि चमेली असे दोन रोबोट्सची नावे आहेत. 

हे रोबोट ग्राहकांसोबत संवाद साधताता आणि त्यांना जेवण वाढतात. बासा सांगतात की, 'स्वदेशी रोबोटकडून सेवा घेणार हे पूर्व भारतातील पहिलेच रेस्तराँ आहे. हे रोबोट रडावर आधारित आहेत. या रोबोट्सना कोणताही भाषा समजते. रोबोटमधील व्हॉइस ऑपरेटेड सिस्टम जेवणासाठी आलेल्या ग्राहकांचे स्वागत करतात. ओडिसातील लोकांना आपल्या मातृभाषेत जेवणाचा आनंद घेता यावा या विचारावर ही सेवा सुरु करण्यात आली आहे.'
 

देशातील इतर रेस्तराँमध्ये आयात रोबोट
बासा सांगतात की, ईशान भारतासह चेन्नई आणि बंगळुरु सारख्या महानगरांमध्ये अनेक रोबोटिक रेस्तराँ आहेत. पण ते सर्व चीनमधून आयात केलेले आहेत. मात्र आमचे रोबोट जयपूर येथील एका स्टार्टअपमध्ये तयार केलेले आहेत. हे रोबोट (एसएलएएम - शॉर्ट सिमुल्टेनियस लोकलायझेशन अॅण्ड मॅपिंग)  तंत्रज्ञानाचा वापर करुन विकसित करण्यात आले आहेत. हे रोबोट स्वतःचा नेव्हिगेट होतात. तसेच आपला मार्ग स्वतः फॉलो करतात आणि सर्व काम पूर्ण करतात. 

बातम्या आणखी आहेत...