आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोबोट बरा करणार विसरण्याचा आजार; रुग्णांचे हावभाव ओळखण्यासाठी टीव्ही दाखवून दिले जातेय प्रशिक्षण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- इंग्लंडमध्ये लवकरच रोबोट डिमेन्शियाने (विसरण्याचा आजार) पीडित रुग्णांवर उपचार करताना दिसणार आहेत. यासाठी त्यांना टीव्हीवरील कार्यक्रम दाखवून या आजाराची लक्षणे ओळखण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. टीव्हीवरील कार्यक्रम पाहून चेहऱ्यावरील हावभाव ओळखणारा हा पहिलाच रोबोट असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या रोबोटचे नाव 'रॉबी' असून, त्याला 'इमरडेल' हा टीव्ही कार्यक्रम दाखवला गेला. त्यात अॅशले थॉमस नावाचे पात्र डिमेन्शियाने ग्रस्त असते. एज हील विद्यापीठाचे संगणक वैज्ञानिक डॉ.एर्डेन्डू बेहेरा व त्यांच्या टीमने हा रोबोट तयार केला आहे. हा रोबोट आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या (एआय) मदतीने मानवी चेहरे ओळखणे, डिमेन्शियाग्रस्तांची काळजी, त्यांना या आजारातून बरे करून गंभीर स्थितीत अशा रुग्णांना गाणीही ऐकवू शकतो, असा विश्वासही या टीमने व्यक्त केला आहे. जगात ४.७ कोटी लोक या आजाराने पीडित आहेत. 

 

खाण्यापिण्यासह औषधे देण्याचीही घेणार काळजी 
डॉ. बेहेरा यांनी सांगितले की, 'रॉबी' डिमेन्शियाने पीडित व्यक्तीची वर्तणूक, त्यांची बौद्धिक समस्या पाहून सक्रियता, खाणेपिणे व रोज नियमितपणे औषधी घेतात का? हेदेखील पाहू शकतो. 
 

बातम्या आणखी आहेत...