आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लेनहीम पॅलेसची सफर घडवेल 'बॅटी,' पर्यटकांसोबतची सेल्फी टि्वटरवर टाकेल 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा जन्म ज्या पॅलेसमध्ये झाला, तेथील सफर घडवण्यासाठी ५ फूट उंचीचा रोबोट बॅटी यास गाइड म्हणून नियुक्ती दिली आहे. चर्चिलचे जन्मस्थान ब्लेनहीम पॅलेसची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात निवड झालेली आहे. बॅटी लोकांना माहिती देण्याबरोबरच त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देतो. तो लोकांसोबत छायाचित्रे काढून त्यांना टिवटरवर हॅशटॅग 'बॅटी इन द प्लेस'सह पोस्टही करणार आहे. बॅटी १२ तास हिंडून लाेकांना हा पॅलेस दाखवतो. त्यानंतर चार्जिंगसाठी आपोआप बंद होईल. रोबोट ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रोबोटिक्स इन्स्टिट्यूटने तयार केला आहे. याची नुकतीच चाचणी घेण्यात आली. 

 

बॅटीकडे पॅलेसची सर्व माहिती व इतिहास फीड 
ब्लेनहीमचे प्रवक्ते जोनाथन प्रिन्स यांनी सांगितले, बॅटीमध्ये ब्लेनहीम पॅलेसची सर्व माहिती व इतिहास फीड करण्यात आला आहे. त्याला उत्तरे देण्यासाठी खूप सक्षम केले आहे. परंतु पॅलेसचा स्टाफ अद्यापही महालातील काही गोष्टींबाबत खूप सतर्क असतो. बॅटीने कधीच प्राचीन कलाकृतीजवळ जाऊ नये, असे त्यांचे प्रयत्न असतात. पॅलेसमध्ये अनेक माैल्यवान वस्तू आहेत. त्यांचे जतन करणे आवश्यक असते. 
 

बातम्या आणखी आहेत...