आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोबोट्स शक्तिशाली आहेच; परंतु आमच्यासाठी धोकादायक नाही 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूझीलंड- २०१५ मध्ये न्यूझीलंडमध्ये नायजेल रिचडर्सने फ्रेंच भाषेची वर्ल्ड स्क्रॅबल चॅम्पियनशिप जिंकली. विशेष म्हणजे त्यांची फ्रेंच भाषा नसताना त्यांनी ही चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले. त्यांनी केवळ नऊ आठवड्यांत स्क्रॅबल डिक्शनरीचे ३ लाख ८६ हजार शब्द पाठ केले. त्यांची ही कामगिरी कृत्रिम बुद्धिमतेपेक्षा (एआय) खरीखुरी बुद्धिमत्ता कसे काम करू शकते? याचे उत्तम उदाहरण आहे. डीप लर्निंग हे मानवाने तयार केलेले लक्ष्य, कार्य आहे. त्याला ऑब्जेक्टिव्ह फॅक्शन म्हणतात. ही अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी योग्य पद्धत आहे. डीप लर्निंग प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. हे एखाद्या निश्चित डोमेनमध्ये खूप शक्तिशाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) खूप उपयोगी आहे. स्वयंचलित वाहनांमुळे सुरक्षा वाढेल, हे उदाहरण आहे. परंतु एआयमुळे अनेक आव्हाने समोर येतील. या तंत्रज्ञानाचे धोके व यासंदर्भात असलेले गैरसमज याच्यातील फरक समजण्याची वेळ आली आहे. प्रथम आम्हाला नोकऱ्या कमी झाल्यासंदर्भात चर्चा करायला हवी. एका डोमेनमध्ये मुबलक साठा असल्यास एआय रुटिन कामांमध्ये मानवाला मागे टाकू शकते. यामुळे पुढील १५ वर्षांत लाखो लोकांचा रोजगार जाऊ शकतो. परंतु त्या कामाचे स्थान एआय घेऊ शकत नाही. चार पद्धतीच्या कामांसाठी काहीच धोका नाही. पहिले क्रिएटिव्ह जॉब्ज आहे. एआयला चांगल्या प्रदर्शनासाठी लक्ष्य द्यावे लागते. तो शास्त्रज्ञ, लेखक, कलाकारांप्रमाणे काम करू शकत नाही. दुसरे म्हणजे अवघड जॉब. जसे एक्झिक्युटिव्ह, राजकीय, अर्थतज्ज्ञ, एआयचे सिंगल डोमेन अशी अनेक अज्ञात कामे आहेत. शिक्षक, डॉक्टर, परिचारिका आदी कामाचे स्वरूप तर खूप व्यापक आहे. या ठिकाणी विश्वासाची गरज आहे आणि एआयकडे हे सर्व नाही. एखाद्या चॅटने कोणाला सांगावे, कर्करोग आहे, हे कोणालाच नको असेल. कोणाला एखाद्या रोबोटकडून देखभाल नको असेल. 

 

अमेरिका, चीनच्या तुलनेत गरीब देश व लहान देश एआयचे फायदे घेऊ शकणार नाहीत. तसेच सुरक्षेसंदर्भात समस्यासुद्धा आहेत. एआय नियंत्रित पद्धतीच्या हॅकिंगचे गंभीर परिणाम होतील. एआयचे धोके पाहता सरकार, कॉर्पोरेट व तज्ज्ञांनी एआयच्या वापरासंदर्भात नियम तयार केले पाहिजेत. एआयमुळे मानव आळशी होईल, या इशाऱ्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. कारण ही खूप लांबची गोष्ट आहे, जेव्हा मानवापेक्षा बुद्धीचे चांगले काम एआयकडून होईल. सामान्य एआयला तर्कशक्ती, नियोजन, भावना, सृजनशीलतेची गरज आहे. हे सर्व गुण एआयमध्ये टाकणे वैज्ञानिकांना शक्य नाही. या सामान्य क्षमता मिळवण्याचा अन्य कोणता मार्ग नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...