आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये रोबोट करताहेत न्यायदान, तीन ई-कोर्टांत सुनावणीपासून ते साक्षीपर्यंत सर्वकाही ऑनलाइन

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : एकीकडे भारतातील न्यायालयांतील प्रकरणांचा बोजा चर्चेत आहे, तर दुसरीकडे चीनमधील न्यायालयांनी खटल्यांचा निपटारा करण्यासाठी ब्लॉकचेन, क्लाऊड कम्प्युटिंग, सोशल मीडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे तंत्र अवलंबत उदाहरण सादर केले आहे.

चीनच्या हेंगझाऊ शहरात २०१७ मध्ये प्रथम इंटरनेट (सायबर) कोर्टाची स्थापना झाली. येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) जजसमोर वादी-प्रतिवादींना ऑनलाइन चॅटद्वारे उपस्थित राहण्याची सुविधा मिळते. सुनावणी, युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकालही ऑनलाइनच दिला जातो. इंटरनेट कोर्टात ऑनलाइन व्यवसायातील वाद, कॉपीराइटची प्रकरणे, ई-कॉमर्स प्रॉडक्ट लायबिलिटी दाव्यांची सुनावणीही होत आहे. सर्वाधिक प्रकरणे मोबाइलद्वारे पैशांचे व्यवहार आणि ई-कॉमर्सशी संबंधित आहेत. त्याशिवाय दिवाणी दाव्यांशी संबंधित तक्रारदाराला आपली तक्रार ऑनलाइन नोंदणी करता येते. त्यानंतर लॉग ऑन करून न्यायालयीन सुनावणीत सहभागी होण्याची सुविधाही आहे. एआय युक्त व्हर्च्युअल जज प्रकरणाच्या सर्व प्रक्रियांवर नजर ठेवतात. 

हेंगझाऊमधील इंटरनेट कोर्टाच्या स्थापनेनंतर बीजिंग आणि गुआंगझाऊ येथेही अशा स्वरूपाचे कोर्ट उघडण्यात आले आहेत. या तिन्ही न्यायालयात एकूण १,१८,७६४ खटले दाखल असून त्यापैकी ८८,४०१ प्रकरणांचा निपटारा झाला आहे. चीनच्या सोशल मीडिया मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्ही-चॅटवर मोबाइल कोर्टाचा एक पर्याय आहे. हा पर्याय चिनी नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय प्रकरण दाखल करणे, सुनावणी आणि पुरावे सादर करण्याची सुविधा देतो.

चीनमधील ९० टक्के कोर्टांत ३० लाख प्रकरणांचे ऑनलाइन कामकाज

हेंगझाऊ येथे सुरु झालेल्या पहिल्या ई-कोर्टातील सुनावणीचे सकारात्मक परिणाम दिसले. खटला दाखल करण्यापासून ते निकालापर्यंत प्रत्येक प्रकरण सरासरी ३८ दिवसांत निकाली लागले. सुप्रीम पीपल्स कोर्टाचे अध्यक्ष व मुख्य न्यायाधीश न्या. झाऊ किआंग म्हणाले की, ऑक्टोबरपर्यंत चीनमधील ९० टक्के न्यायालयांत सुमारे ३० लाख खटले या ना त्या प्रकारे ऑनलाइन पाहिले जात आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...