आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लखनऊ (उत्तर प्रदेश) - गोमतीनगर परिसरात जनेश्वर मिश्र पार्कच्या गेट क्रमांक दोनजवळ गुरुवारी संध्याकाळी स्टंट करताना दोन तरुणांचे बाइकवरील नियंत्रण सुटले. बाइकवर मागे बसलेला तरुण उसळून गोल चक्करच्या ग्रीलमध्ये लागलेल्या सळयांवर पडला. 18 सेंमी लांबीची सळई त्याचा जबडा फाडून आरपार झाली. तासभर अथक प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी मानेजवळून सहई कापून त्याला ट्रॉमा केअर सेंटरला पोहोचवले. तब्बल दोन तासांपर्यंत चाललेल्या ऑपरेशननंतर सळई काढता आली. सध्या तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
स्टंट करणाऱ्या तरुणांची नावे कौनेन आणि मोहम्मद सारिक अशी आहेत. दोघांचे वय 24-25 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ते रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी निघाले होते आणि 90 किलोमीटर प्रति तास वेगाने बाइक चालवून स्टंट करत होते. अचानक बाइक डिव्हायडरला धडकून अनियंत्रित झाली आणि दुर्घटना होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.