Home | Sports | Other Sports | roger federer enter in third round french open

फेडरर, वोझानिकी, स्टोसूरची तिसऱ्या फेरीत धडक

Agency | Update - May 26, 2011, 06:03 PM IST

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील अटीतटीच्या लढतीत अव्वल मानांकित टेनिसपटूंनी सलामीच्या विजयी खेळीला उजाळा देत तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे.

  • roger federer enter in third round french open

    पॅरिस - फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील अटीतटीच्या लढतीत अव्वल मानांकित टेनिसपटूंनी सलामीच्या विजयी खेळीला उजाळा देत तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे.

    पुरुष एकेरीत मानांकित रोजर फेडररपाठोपाठच महिला एकेरीत कैरोलीन वोझानिकी, संमथा स्टोसुर या आघाडीच्या टेनिसपटूंनीही शर्थीची झुंज देऊन तिसऱ्या फेरीत स्थान मजबूत केले आहे. एकेरीतील लढतीत वोझानिकीविरुध्द वोझानिकची खेळी अधिकच झुंजली होती. अखेर आपल्या आक्रमक खेळीच्या बळावर वोझानिकीने विजयी खेळी करून नवख्या वोझानिकला पराभवाची धूळ चारून स्पर्धेतील आव्हान बळकट केले.

    आक्रमक खेळीच्या बळावर पुरुष एकेरीच्या शानदार लढतीत रोजर फेडररने 6-3, 6-0,6-2 गुणांच्या आघाडीने फ्रासिंसी टेनिसपटू मैक्सिम टिक्सेयराला नमवून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली.

    विजयी सलामी देणाऱ्या अव्वल मानांकित स्टोसुर,वोझानिकी या आघाडीच्या टेनिसपटूंनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या तिस:या फेरीत धडक मारली.प्रथम मानांकित कैरोलीन वोझानिकीने कॅनडीयन टेनिसपटू अलेक्साड्रा वोझानिकला 6-3,7-6(8/6) गुणांनी पराभवाची धक्का देत तिसऱ्या फेरीत स्थान प्रवेश केला.

Trending