आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- लॉर्ड्सपासून 16 किमीवर ऑल इंग्लंड क्लबमध्ये रविवारी 4 तास 55 मिनिटांची सर्वांत प्रदीर्घ विम्बल्डन फायनल झाली. यापूर्वी 2008 मध्ये नदाल व फेडररचा सामना 4 तास 48 मिनिटे चालला होता. रविवारी अग्रमानांकित नोवाक योकोविकने पाचव्यांदा विम्बल्डन किताब जिंकला. त्याने द्वितीय मानांकित रॉजर फेडररला 7-6, 1-6, 7-6, 4-6, 13-12 ने हरवले. सर्बियाच्या योकोविकचे हे 16 वे ग्रँडस्लॅम व कारकीर्दीतील 75 वा किताब आहे. स्पर्धेनंतर योकोविकला 20 कोटी रुपये आणि फेडररला 10 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. यावेळी दोघांच्याही पत्नी मैदानात उपस्थित होत्या. यावेळी फेडररच्या पत्नीचे काही गंभीर मुद्रेतले फोटो टिपले गेले आहेत.
पुढील स्लाइटवर पाहा फेडररच्या पत्नीचे काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.