आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडरर विक्रमी १५ व्यांदा उपांत्य फेरीत; आता याेकाेविकशी झंुजणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - स्वीसकिंग राॅजर फेडररने आपल्या उल्लेखनीय खेळीच्या बळावर पुन्हा एकदा वयाचा आणि लाॅजिकला मागे टाकले. या स्वीसच्या ३८ वर्षीय टेनिसपटूने सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम आॅस्ट्रेलियन आेपनमध्ये वयाने १० वर्षे लहान असलेल्या सेंडग्रेनचा पराभव केला. त्याने पाच सेंटपर्यंत  रंगलेल्या लढतीत ६-३, २-६, २-६, ७-६, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने विक्रमी १५ व्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. अशा प्रकारे एका ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये १५ वेळा प्रवेश करणारा फेडरर हा आेपन एरामधील (१९६८ नंतर) पहिला टेनिसपटू ठरला. तिसऱ्या मानांकित फेडररने जागतिक क्रमवारीत १०० व्या स्थानावर असलेल्या सेंडग्रेनला पराभूत करण्यासाठी माेठी कसरत करावी लागली. मात्र, त्याने तीन तास २८ मिनिटे शर्थीची झंुज देऊन पाच सेटपर्यंत रंगलेला हा सामना जिंकला.  स्वीसच्या राॅजर फेडररचा आता पुरुष एकेरीचा उपांत्य सामना गत चॅम्पियन नाेवाक याेकाेविकशी हाेणार आहे. दुसऱ्या मानांकित याेकाेविकने एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात ३२ व्या मानांकित मिलाेस राआेनिकला पराभूत केले. त्याने ६-४, ६-३, ७-६ अशा फरकाने  मात केली.

फेडररच्या १५११ मॅच मात्र, एकही अर्ध्यावर साेडली नाही 
स्वीसच्या फेडररने आपल्या टेनिसच्या करिअरमध्ये आतापर्यंत १५११ सामने खेळले आहेत. मात्र, यादरम्यान त्याने काेणताही सामना अर्ध्यावर साेडला नाही. आता सेंडग्रेनविरुद्ध सामन्यादरम्यान फेडरर हा सामना अर्ध्यावर साेडण्याचे चित्र निर्माण झाले हाेते. त्याला गंभीर दुखापत झाली हाेती. मात्र, त्याने   खेळीत सातत्य ठेवत शेवटचे दाेन्ही सेट जिंकले आणि आपला राेमहर्षक विजय निश्चित केला.

याेकाेविकने गाठली आठव्यांदा सेमीफायनल
दुसरा मानांकित याेकाेविक हा करिअरमध्ये आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल खेळणार आहे. सात वेळच्या चॅम्पियन या टेनिसपटूने  राअोनिकचा सलग दहाव्यांदा पराभव केला आहे. 

बार्टी पहिल्यांदा सेमी फायनलमध्ये; ३६ वर्षांनंतर पहिली आॅस्ट्रेलियन खेळाडू
जगातील नंबर वन महिला टेनिसपटू अॅश्ले बार्टीने पहिल्यांदाच आॅस्ट्रेलियन आेपनची उपांत्य फेरी गाठली. तिने लढतीत सातव्या मानांकित पेत्रा क्विताेव्हावर मात केली. तिने ७-६, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. या अव्वल मानांकित टेनिसपटूने गत उपविजेत्या क्विताेव्हाला अवघ्या १०४ मिनिटांत बाहेरचा रस्ता दाखवला. अशा प्रकारे ३६ वर्षांनंतर या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी बार्टी ही पहिली आॅस्ट्रेलियन महिला टेनिसपटू ठरली आहे.