आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा एकदा आजीच्या भूमिकेत दिसणार रोहिणी हट्टंगडी, आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल खट्याळ आजी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'होणार सून मी या घरची'मधील आई आजी असो, किंवा 'चार दिवस सासूचे' मालिकेतील सासू; रोहिणी हट्टंगडी या नावाची जादू नेहमी निराळीच असते. सगळ्यांची लाडकी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. जान्हवीची आजेसासू, 'झी युवा' वाहिनीवर एका खट्याळ आजीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कडक आणि शिस्तप्रिय सासू म्हणून आणि प्रेमळ आजी म्हणून याआधी अनेकदा रोहिणी हट्टंगडी यांना प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. या अष्टपैलू अभिनेत्रीला आता एका वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी मिळणार आहे. 'डॉक्टर डॉन' मालिकेतील या आजीचा लुक कसा असेल, याविषयी सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे.

'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेच्या निमित्ताने एक मॉडर्न आजी रोहिणी हट्टंगडी साकारणार आहेत. आजवर त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा निराळी आणि मजेशीर अशी ही भूमिका असेल. त्यांना एका अफलातून लुकमध्ये पाहण्याची संधी सुद्धा त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. उत्कृष्ट अभिनय आणि विशेष लुकचं सरप्राईज अशी दुहेरी धमाल सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे.