आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका कसोटी मालिकेत सर्वाधिक १७ षटकार ठोकणारा रोहित ठरला जगातील पहिला फलंदाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी कारकीर्दीतील सहावे शतक फटकावून रोहित शर्माने शनिवारी नाबाद ११७ धावा केल्या. भारताच्या ३ बाद २२४ धावा असताना अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. रोहितने ३ सामन्यांच्या मालिकेत १७ षटकार ठोकले आहेत. जगात ही कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. आजवर सर्वाधिक १५ षटकारांचा विक्रम वेस्ट इंडिजचा शिमरॉन हेटमेअर याच्या नावे होता.

दुसऱ्यांदा षटकाराने शतक पूर्ण करून गंभीरची बरोबरी
रोहित शर्माने षटकार मारून कारकीर्दत दुसऱ्यांदा शतक पूर्ण केले आहे. ही कामगिरी करत त्याने गौतम गंभीरच्या कामगिरीची बरोबरी केली. या कामगिरीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी असून सचिनने कारकीर्दीत सहा वेळा षटकार ठोकून शतक साजरे केले आहे. 
 
 

बातम्या आणखी आहेत...