आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे रोहीत पवार यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांना पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत - कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे मतदानाच्या एक दिवस आधी दोघांना मतदारांना पैशाचे वाटप करताना रंगेहाथ पकडले. भरारी पथक आणि कर्जत पोलिसांनी रविवारी रात्री 11 वाजता ही कारवाई केली. किशन जाधव असे एकाचे नाव असून तो पारवाडी (ता. बारामती) येथील रहिवासी आहे. त्यांच्याकडे बरीच रोख रक्कम आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे स्टिकर असलेले तीन मोबाईल सापडले. दोघेही रोहित पवार यांच्या कार्यालयात कामाला असून त्यांच्याच ऑफिसमधून आलो असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. कर्जत पोलिस पुढील तपास करत आहेत.