आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्टइंडीज विरूद्धच्या चौथ्या सामन्यात रोहीतच्या नावावर विविध विक्रम. अजून तीन भारतीयांच्या नावे आहे \'हा\' विक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने धडाकेबाज 162 धावांची शतकी खेळी केली. भारतीय क्रिकेटपटूद्वारे घरच्या मैदानावर केलेली ही सर्वाधिक खेळी आहे. याआधी कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूने घरच्या मैदानावर 150 धावांपेक्षा अधिक खेळी केलेली नाही. आतापर्यंत फक्त 5 फलंजांनी आपल्या होम ग्राऊंडवर शतक झळकावले आहे. 

 

> सोमवारी मुंबईतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 224 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात रोहित शर्माने घरच्या मैदानावर 20 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने केलेल्या 162 धावांसोबत इतरही विश्वविक्रम स्थापित केले आहे. 2018 मधील रोहीत शर्माचा हा सर्वाधिक स्कोर आहे. भारताने दिलेल्या 378 धावांचा पाठलाग करतांना विंडीज 36.2 ओवरमध्ये सर्वबाद 153 धावा करू शकली. एखाद्या फलंदाजाच्या धावसंख्येपेक्षा विरोधी संघाची एकूण धावसंख्या कमी असल्याची क्रिकेट जगतातील ही पाचवी घटना आहे. रोहित शर्माने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. दोनवेळा अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. 

 

> याआधी कोलकात्याच्या ईडन गार्डन येथे श्रीलंकेविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात रोहीत शर्माने सर्वाधिक 264 धावा केल्या होत्या, त्यावेळी प्रतिउत्तरात श्रीलंकन संघ 251 धावांवर बाद झाला होता. 2003 च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने नामिबीया विरूद्ध 152 धावा केल्या होत्या. आणि प्रतिस्पर्धी संघ 130 धावांवर बाद झाला होता. याव्यतिरिक्त युवराज सिंगने 2003 साली बांग्लादेश आणि मोहम्मद कैफने 2005 मध्ये झिंबाँम्बेविरूद्ध अशी कामगिरी केली आहे.  

ब्रेबॉन स्टेडियममध्ये रोहीत शर्माने प्रथम श्रेणीत क्रिकेट स्पर्धेत त्रिशतकीय, ए लिस्टमध्ये दीडशतकीय आणि टी-20 सामन्यात शतकीय खेळी केली आहे. एकाच मैदानावर अशी कामगिरी करणारा रोहित तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी जेम्स हिल्ड्रेथने टांटन येथील काउंटी मैदानावर आणि माईकल कारबेरीने साउथथैम्प्टनच्या एजीस बोल मैदानावर अशी चमकदार कामगिरी केली होती.

 

> रोहीत शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सात वेळात 150 धावांचा पल्ला पार केला आहे. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत एकाही भारतीय क्रिकेटपटूने पाच पेक्षा जास्तवेळा 150 धावा केलेल्या नाहीत. एका मालिकेत दोनवेळेत 150 धावा करणारा रोहीत दूसरा क्रिकेटपटू आहे. याआधी हॅमिल्टन मसकजादाने 2009 मध्ये केनियाविरूद्ध खेळतांना एकाच मालिेकेत 150 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 

 

> सलामीवीर म्हणून रोहीत शर्माचे हे 19 वे शतक असून सलामीवीर म्हणून सर्वांत जास्त झळकावणाऱ्यांच्या यादीत सौरव गांगुली (19) सोबत रोहीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतील 49 एकदिवसीय शतकांमध्ये 46 शतके सलामीवीर म्हणून केले आहेत. रोहीत शर्माची 162 धावांची खेळी यावर्षीची भारतीय क्रिकेटपटू खेळण्यात आलेली सर्वाधिक खेळी आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केपटाउन येथे विराट कोहलीने केलेल्या 160 धावांचा विक्रम मोडीत काढला. 
 
> रोहीत शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 186 डावांत 21 शतक झळकावले आहे. हाशिम आमला (116), विराट कोहली (138), आणि एबी डिव्हिलिअर्स (183) यांच्यानंतर कमी डावांत 21 शतक करणाऱ्यांच्या यादीत रोहीत शर्माचा क्रमांक लागतो. ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळलेल्या शतकी खेळीमध्ये रोहीत शर्माने षटकारांच्या बाबतीत सचिन तेंडूलकरला (195) मागे टाकले आहे. 

 

> एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहीत शर्माने आतापर्यंत 198 षटकार लगावले आहेत. सर्वाधीक षटकार मारणाऱ्यांच्या भारतीयांच्या यादीत महेंद्र सिंग धोनी (218) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सातव्या क्रमांकावर आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...