आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविशाखापट्टणम- भारतीय संघाच्या राेहित शर्माने मिळालेल्या संधीला सार्थकी लावताना कसाेटीमध्ये सलामीवीराची भूमिका यशस्वीपणे बजावली. याच भूमिकेत दिमाखदार खेळी करताना त्याने पहिल्याच कसाेटीमध्ये विश्वविक्रमाला गवसणी घातली. राेहित हा सलामीवीराच्या भूमिकेत पदार्पणातील कसाेटीच्या दाेन्ही डावांत शतकी खेळी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याने शनिवारी दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध सलामीच्या कसाेटी सामन्यात हा पराक्रम गाजवला. त्याने पहिल्या डावात १७६ अाणि अाता दुसऱ्या डावामध्ये १२७ धावांची खेळी केली. यासह त्याने कसाेटीत सलग दुसरे शतक साजरे केले. यासह भारताने पाहुण्या अाफ्रिकेसमाेर खडतर ३९५ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने अापला दुसरा डाव ४ बाद ३२३ धावांवर घाेषित केला. भारताने पहिल्या डावामध्ये ५०२ धावांची खेळी केली. त्यानंतर अाफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या ३४१ धावांवर गुंडाळला. यासह भारताने पहिल्या डावात १६१ धावांची अाघाडी मिळवली.
सुरुवातीची १० षटके सांभाळून खेळ, काेचचा राेहितला सल्ला :
सलामीवीराच्या भूमिकेतील पदार्पणाच्या कसाेटीतील सुरुवातीची १० षटके सांभाळून खेळ कर. त्यामुळे तुला मैदानावर खेळण्याचा अचूक असा अंदाज येईल. त्यानंतर मनासारखी खेळी कर, असा माैलिक सल्ला राेहितला काेच दिनेश लाडने दिला हाेता. प्रशिक्षकांच्या या महत्त्वाच्या टिप्सचा राेहितला माेठा फायदा झाला. त्याने याचे काटेकाेरपणे पालन करून दाेन्ही डावांत शतकी खेळी
करण्याचा भीमपराक्रम गाजवला. राेहितच्या नावे वनडेत द्विशतकाचीही नाेंद अाहे.
दाेन्ही डावांत यष्टिचीत हाेणारा राेहित हा पहिला फलंदाज; पुजाराचे अर्धशतक
भारतीय संघाकडून राेहित अाणि पुजाराने (८१) दुसऱ्या विकेटसाठी १६९ धावांची भागीदारी रचली. दरम्यान राेहित हा यष्टीचीत झाला. अशा प्रकारे ताे एका कसाेटीच्या दाेन्ही डावात यष्टीचीत हाेणारा पहिला फलंदाज ठरला. दुसऱ्या डावामध्ये ताे केशव महाराजच्या चेंडूवर डिकाॅककडून यष्टीचीत झाला अाहे.
भारताचे २७ षटकार, न्यूझीलंडला टाकले मागे
भारतीय संघाच्या फलंदाजांनी सामन्यात २७ षटकार ठाेकले. यासह टीमच्या नावे एका सामन्यात सर्वाधिक षटकारांची नाेंद झाली. यात भारताने न्यूझीलंडला मागे टाकले. न्यूझीलंड संघाचे २०१४ मध्ये पाकविरुद्ध सामन्यात २२ षटकार हाेते. त्यानंतर अाता पाच वर्षानंतर भारताने अव्वल कामगिरी करताना न्यूझीलंडवर मात केली.
अाफ्रिकेचे सातव्यांदा भारतात डावात ४०० रन
दक्षिण अाफिका संघाने भारतामध्ये सातव्या मैदानावर डावात ४०० पेक्षा अधिक धावांची खेळी केली. याच्या बळावर अाफ्रिकेने चार कसाेटी सामने जिंकले. तसेच दाेन कसाेटीत बराेबरी साधली. मात्र, अाफ्रिकेला चाैथ्या डावात एकदाच ३९५ पेक्षा अधिक धावा काढत पहिल्यांदाच विजयाची नाेंद करता येईल.
भारत : पहिला डाव : ५०२ धावा
द. अाफ्रिका : पहिला डाव : ३४१ धावा
भारत (दुसरा डाव) धावा चेंडू ४ ६
मंयक अग्रवाल झे. डुप्लेसिस गाे. केशव ०७ ३१ ०१ ०
राेहित शर्मा यष्टी.डिकाक गाे. केशव १२७ १४९ १० ७
पुजारा पायचीत गाे.फिलेंडर ८१ १४९ १३ २
रवींद्र जडेजा त्रि. गाे.कागिसाे रबाडा ४० ३२ ०० ३
विराट काेहली नाबाद ३१ २५ ०३ १
अजिंक्य रहाणे नाबाद २७ १७ ०४ १
अवांतर : १०. एकूण : ६७ षटकांत ४ बाद ३२३ धावा (डाव घाेषित) . गडी बाद क्रम : १-२१, २-१९०, ३-२३९, ४-२८६. गाेलंदाजी : वेर्नाेन फिलेंडर १२-५-२१-१, केशव महाराज २२-०-१२९-२, कागिसाे रबाडा १३-३-४१-१, डाने पिएडेट १७-३-१०२-०, मुथुस्वामी ३-०-२०-०.
दक्षिण अाफ्रिका (दुसरा डाव) धावा चेंडू ४ ६
एेडन मार्कराम नाबाद ०३ १८ ०० ०
डिन एल्गर पायचीत गाे. जडेजा ०२ १६ ०० ०
ब्रुयन नाबाद ०५ २० ०१ ०
अवांतर : ०१. एकूण : ९ षटकांत १ बाद ११ धावा. गडी बाद हाेण्याचा क्रम : १-४. गाेलंदाजी : अार. अश्विन ५-२-७-०, रवींद्र जडेजा ४-२-३-१.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.