आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या टी-20 सामन्यापूर्वीच रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत; मात्र पहिल्या टी-20 सामन्यासाठी फीट असल्याचे घोषित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क - बांग्लादेशसोबत रविवारी टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी कर्णधार रोहित शर्मा शुक्रवारी सरावादरम्यान जखमी झाला होता. यानंतर बीसीसीआयच्या मेडिकल टीमने तपासणी केल्यानंतर रोहित पूर्णपणे फिट असल्याचे सांगितले आहे. यानंतर रोहित पहिला टी-20 सामना खेळणार असल्याचे मंडळाने सांगितले आहे.  

थ्रो डाउनचा सराव करताना झाली दुखापत
रोहित शर्माला थ्रो डाउन सरावादरम्यान डाव्या जांघेत दुखापत झाली होती. यामुळे रोहित मैदानातून बाहेर पडला होता. रोहित नेट्समधून बाहेर पडल्यानंतर फिजिओंकडे गेला. मात्र तो सरावासाठी मैदानात परतला नाही. फलंदाज सामान्यत: मुख्य गोलंदाजांपूर्वी थ्रो डाउनचा सामना करतात. यामुळे त्यांना लयमध्ये येण्यात मदत मिळते. 
 

 

विराट कोहलीला दिला आराम
भारत आणि बांग्लादेश दरम्यान तीन टी-20 आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत पहिला टी-20 सामना 3 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे रोहित शर्माकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...