आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rohit Sharma Ruled Out Of ODI,Test Series Against New Zealand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंड्यानंतर रोहित शर्मादेखील वन-डे आणि टेस्ट सीरीजमधून बाहेर, पाचव्या टी-20 सामन्यात फलंदाजीदरम्यान जखमी झाला होता

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत-न्यूजीलँडमध्ये 3 वन-डे सीरीज 5 फेब्रुवारी आणि 2 टेस्टची सीरीज 21 फेब्रुवारीपासून होत आहे

स्पोर्ट डेस्क- भारतीय वन-डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा न्यूजीलँडविरुद्ध वन-डे आणि टेस्ट सीरीजमधून बाहेर गेला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. रोहित न्यूजीलँडविरुद्ध रविवारी झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात पायात दुखापत झाल्यानंतर रिटायर्ड हर्ट होऊन मैदानातून बाहेर गेला होता. त्यावेळेस रोहित 60 रनावर खेळत होता. त्यानंतर त्याच्या जागी शिवम दुबे फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. रोहितपूर्वी भारतीय ऑलराउंडर हार्दिक पंड्यादेखील न्यूझीलँडविरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजमधून बाहेर पडला आहे.


अद्याप बीसीसीआयने रोहित बाहेर गेल्याची अधिकृत घोषणा केली नाही. पण, जर रोहित बाहेर गेला तर त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात जागा मिळू शकते. रोहितने पाचव्या टी-20 मध्ये कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपद स्विकारले होते न्यूजीलँडविरुद्ध पाचव्या टी-20 मध्ये संजू सॅमसमला संधी देण्यासाठी कोहली बाहेर बलला होता. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे कर्णधारपद गेले होते. 17 व्या ओव्हरमध्ये रोहितला मांडीच्या मांसपेशीत ताण आल्याचे जाणवले, त्यानंतर तो लंगडत चालत असल्याचे दिसते. त्यानंतर फिजीओने त्याची ट्रिटमेंट केली आणि रोहित खेळू लागला. पण, 2-3 बॉल खेळल्यानंतर रोहित मैदानातून बाहेर पडला.