आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित शर्माने बाद झाल्याचे छायाचित्र केले शेअर; विंडीजविरुद्ध रोहितला झेलबाद दिले होते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - टीम टीम इंडियाचा उपकर्णधार व सलामीवीर रोहित शर्माला गुरुवारी वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात झेलबाद दिले होते. केमार रोचच्या चेंडूवर यष्टिरक्षक शाय होपने त्याचा झेल टिपला. रोहितचा चेंडू बॅटला लागून गेला की पॅडला या निर्णयावर जोरदार चर्चा होत आहे. 


सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहितने आपण बाद झाल्याचे छायाचित्र शेअर केले, ज्यात स्पष्ट दिसतेय की चेंडू बॅटपासून दूर होता. जो आवाज आला होता, तो चेंडू पडल्यावर पॅडला चाटून गेल्याचा होता. रोहित सामन्यात चांगल्या लयीत दिसत होता. त्याने एक चौकार व एक षटकार खेचत १८ धावा काढल्या होत्या. तेव्हा सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला बाद होण्याचे अपील करण्यात आले. ऑन फिल्ड अंपायरने रोहितला नाबाद दिले होते. विंडीजने रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरने केवळ एक वेळा स्निकोच्या मदतीने रिप्ले पाहिला. काही आवाज ऐकू आला अाणि रोहितला लगेच बाद दिले. थर्ड अंपायरने एकदाही चेंडू बॅटला लागला की पॅडला, हे पाहिले नाही. त्यामुळे निर्णयावर टीका होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...