आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित शर्माचा डबल धमाका, कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क - भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेती तिसरा आणि शेवटचा सामना रांची येथे खेळवला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने आपल्या कसोटीतील कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. तो 212 धावांवर असताना रबाडाने त्याला तंबूत पाठवले. दरम्यान या सामन्यात अजिंक्य रहाणेने आपल्या कसोटीच्या कारकिर्दीतील 11 वे शतक झळकावले. तो 115 धावा करून जॉर्ज लिंडेच्या चेंडूवर बाद झाला. रहाणे आणि रोहितने चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी केली. 

पहिल्या दिवशी भारतीय संघाची डगमगत सुरुवात झाली. भारताच्या 39 धावांवर तीन गडी बाद झाले होते. मयंक अग्रवाल (10), चेतेश्वर पुजारा (0) आणि विराट कोहली (12) धावा करून तंबूत परतले. 

रोहित दक्षिण आफ्रिका विरुद्ध एका मालिकेत 500+ धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज
रोहित शर्मा या द्विशतकाबरोबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध सर्वाधिक 500+ धावा करणारा पहिला भारतीय बनला आहे. यापूर्वी  माजी कर्णधार मो. अजहरुद्दीनने 1996-97 मध्ये घरच्या मैदानावर 388 धावा केल्या होत्या. रोहित कोणत्याही कसोटी मालिकेत 500+ धावा करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी वीनू मांकड, बुधी कुंदरन, सुनिल गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी अशी कामगिरी केली आहे. 
 
 

बातम्या आणखी आहेत...