आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट डेस्क- विश्पचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूजीलंडकडून मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघात अनेक फेरबदल केले जाऊ शकतात. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) च्या एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, विराट कोहलीकडून वनडे आणि टी-20 कर्णधारपद घेऊन रोहित शर्माला नवीन कर्णधार घोषित केले जाऊ शकते. पण टेस्ट कर्णधारपदी कोहली कायम असेल. फेरविचारानंतर संघाने अनेक बदल केले जातील.
अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, "संघाला आणखी चांगले बनवण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू होईळ. ही चांगली वेळ आहे की, रोहित शर्मा 50 ओव्हर फॉर्मेटचा कर्णधारपद सांभाळावे आणि यासाठी मानसिक तयारी करावी. यासाठी सध्याच्या कर्णधाराने आणि सलेक्टर्सने सपोर्ट करायला हवा. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये वाद असल्याच्या अफवांचे खंडन केले.
कर्णधारपदासाठी रोहित चांगला पर्याय
ते पुढे म्हणाले, "आता जे होऊन गेले, त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही, आता पुढचा विचार करायला हवा. हीच वेळ आहे की, आपल्याला येणाऱ्या वर्ल्डकपची तयारी सुरू करावी लागेल. संघाच्या कामगिरीवर विचार करून रणनिती आकली पाहिजे. आम्हाला माहिती आहे की, संघात काही विशिष्ठ ठिकाणी बदल करण्याची गरज आहे. रोहित यासाठी सगळ्यात चांगला पर्याय आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.