• Rohit Sharma's first hundred as opener batsman

भारत वि / राेहितचे पहिल्यांदा ओपनिंगला शतक; टीम इंडियाचा ठरला चाैथा फलंदाज

हिली कसाेटी/पहिला दिवस : भारताच्या दिवसअखेर बिनबाद २०२  धावा

वृत्तसंस्था

Oct 03,2019 09:48:00 AM IST

विशाखापट्टणम - कसाेटी क्रिकेटमधील सलामीवीराच्या नव्या भूमिकेत टीम इंडियाचा राेहित शर्मा यशस्वी ठरला. त्याने नव्या भूमिकेच्या पदार्पणामध्येच शानदार शतकाची नाेंद केली. राेहित शर्माने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीच्या कसाेटी सामन्यात पहिल्याच दिवशी ११५ धावांची शानदार खेळी केली. याच शतकाच्या बळावर यजमान टीम इंडियाने दिवसअखेर पहिल्या डावात बिनबाद २०२ धावा काढल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ ५९.१ षटकांपर्यंतच हाेऊ शकला. दरम्यान, भारताकडून युवा सलामीवीर मयंक अग्रवालनेही (८४) शानदार नाबाद अर्धशतकी खेळीचे महत्त्वपूर्ण याेगदान दिले. त्यामुळे भारताला पहिल्या दिवशी विकेट न गमावताही धावांचा माेठा स्काेअर उभा करता आला.


राेहित शर्माने २७ व्या कसाेटीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना सर्वांचे लक्ष वेधले. मात्र, यापेक्षाही त्याने सलामीवीराच्या भूमिकेत पहिलीच कसाेटी खेळताना माेठा पराक्रम गाजवला. आेपनिंग करताना शानदार शतक साजरे करणारा राेहित शर्मा हा भारताचा चाैथा फलंदाज ठरला. तसेच त्याच्या करिअरमध्ये सलामीवीराच्या भूमिकेतील हे पहिलेच शतक ठरले. यासह त्याने कसाेटीतील चाैथे शतक साजरे केले.

तिन्ही फाॅरमॅटमध्ये शतकवीर राेहित हा आठवा सलामीवीर

> क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये (वनडे, कसाेटी, टी-२०) शतक ठाेकणारा राेहित जगातील आठवा सलामीवीर फलंदाज

> यापुर्वी गेल, मॅक्लुम, मार्टिन गुप्टिल, दिलशान, शहजाद, वाॅटसन, तमीम इक्बालने हा पराक्रम गाजवला आहे.

> काेहलीने कसाेटीत नेतृत्व करताना २२ व्यांदा नाणेफेक जिकंली. यातील एकाही कसाेटीत टीमचा पराभव झाला नाही. यातील १८ कसाेटीत विजय, तीन कसाेटी ड्राॅ झाल्या आहेत.

> राेहितच्या घरच्या मैदानावर कसाेटीत सलग सहाव्या डावात ५०+ धावा.

कसाेटीत पहिल्यांदा सलामी करतानाचे शतकवीर फलंदाज

फलंदाज धावा

शिखर धवन 187

प्रतिस्पर्धी वर्ष

ऑस्ट्रेलिया 2013

फलंदाज धावा

केएल राहुल 110

प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया

वर्ष 2015

फलंदाज धावा

पृथ्वी शॉ 134

प्रतिस्पर्धी वर्ष

वेस्ट इंडीज 2018

फलंदाज धावा

रोहित शर्मा 115*

प्रतिस्पर्धी वर्ष

द. आफ्रिका 2019

ओपनर रोहितचे प्रत्येक वेळी ४ पेक्षा वेळेत शतक

> वनडेमध्ये चार डाव

> टी-२० दोन डाव

> कसाेटी एक डाव

हाेम ग्राउंडवर रोहितची सरासरी डाॅनच्या बराेबरीत

फलंदाज हाेम कसाेटी सरा.

डॉन ब्रॅडमन 33 98.22

रोहित शर्मा 10 98.22

अॅडम वोजेस 8 86.25

रोहित शर्मा 10 98.22

अॅडम वोजेस 8 86.25

X
COMMENT