• Home
  • Bollywood
  • News
  • Rohit Shetty buys 3 million Lamborghini car, company writes 'extraordinary car for extraordinary personality'

सेलेब लाइफ / रोहित शेट्टीने खरेदी केली 3 कोटींची लॅम्बोर्गिनी कार, कंपनीने लिहिले - 'असामान्य व्यक्तिमत्वासाठी असामान्य कार' 

मुंबईमध्ये या कारची ऑनरोड किंमत 3.45 कोटी रुपये आहे 

Nov 08,2019 11:49:36 AM IST

बॉलिवूड डेस्क : 'गोलमाल' आणि 'सिंघम' फ्रान्चायसीचा डायरेक्टर रोहित शेट्टीने अशातच ब्राइट यलो कलरची लॅम्बोर्गिनी यूरस खरेदी केली आहे. लॅम्बोर्गिनी मुंबईने आपल्या इंस्टाग्राम पेजद्वारे ही माहिती दिली आहे. कंपनीने रोहित शेट्टीचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो कारसमोर उभा राहून पोज देत आहे.

'असामान्य व्यक्तिमत्वासाठी असामान्य कार'

फोटोच्या कॅप्शनमध्ये कंपनीने लिहिले आहे, "असामान्य व्यक्तिमत्वासाठी असामान्य कार. लॅम्बोर्गिनी मुंबईने भारतातील सर्वात यशस्वी फिल्ममेकर्सपैकी एक रोहित शेट्टी याला यूरस डिलीव्हर केली. यूरसचे भव्य डिजाइन आणि उत्तम प्रदर्शन हे त्याचे व्यक्तिमत्व दर्शवते." ऑक्टोबरमध्ये अभिनेता रणवीर सिंहनेदेखील लाल रंगाची लॅम्बोर्गिनी यूरस घेतली आहे.

मुंबईमध्ये ऑनरोड किंमत 3.45 कोटी...

मुंबईमध्ये या सुपर स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेहिकल (एसयूवी) ची एक्स-शोरूम आणि ऑन रोड किंमत अनुक्रमे सुमारे 3.10 कोटी आणि सुमारे 3.45 कोटी रुपये. ही जगातील सर्वात फास्ट एसयूव्हीजपैकी एक असल्याचे सांगितले जाते. ही कार 3.6 सेकंदात 0-100 किमी. प्रति तासाच्या स्पीडने धावते.

2020 मध्ये येईल रोहितचा नवीन चित्रपट...

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणून दिग्दर्शक रोहितचा यापूर्वीच चित्रपट 'सिम्बा' डिसेंबर 2018 मध्ये रिलीज झाला होता. रणवीर सिंह आणि सारा अली खान स्टारर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्याचा आगामी चित्रपट कॉप ड्रामा 'सूर्यवंशी' आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 27 मार्च 2020 ला रिलीज होणार आहे.

X