आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rohit Shetty Said On Delhi Violence, Only This Time Will Keep The Situation Under Control

दिल्ली हिंसाचारावर रोहित शेट्टी म्हणाला, 'सध्याच्या स्थितीत शांत राहिल्याने परिस्थिती नियंत्रणात येईल'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. गेल्या आठवड्यात दिल्लीतील हिंसाचारात जवळपास 47 जणांनी आपला जीव गमावला. तेथे अजूनही परिस्थिती पूर्णपणे सामान्य झालेली नाही. दिल्लीतील हिंसाचाराबद्दल अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. अशा स्थितीत सोमवारी जेव्हा 'सूर्यवंशी'चा ट्रेलर लाँच झाला होता तेव्हा दिग्दर्शक रोहित शेट्टीकडून दिल्ली हिंसाचाराबद्दल त्याची प्रतिक्रिया माध्यमांनी जाणून घेतली. 

रोहित म्हणाला, हा एक अत्यंत गंभीर विषय असून यावर बरेच लोक बोलत आहेत. माझ्या मते, या वेळी आपल्या सर्वांनी शांत राहणे योग्य होईल. आमचे अधिकारी, सरकार आणि बरेच लोक तिथे आहेत. या घटनेवर उभे राहणे आणि त्याबद्दल बोलणे खूप सोपे आहे, परंतु लोक ज्या परिस्थितीला सामोरे जात आहेत ती अतिशय गंभीर आहे, म्हणून यावेळी संपूर्ण भारतासाठी मौन बाळगणे चांगले होईल. अक्षय कुमार, अजय देवगन, रणवीर सिंग यांनीही रोहित मताशी सहमती दर्शविली.

निर्भयाच्या दोषींना कडक शिक्षा मिळावी

या कार्यक्रमात मीडियाने निर्भयाच्या दोषींची फाशी वारंवार टळत असल्यावर 'सूर्यवंशी'च्या टीमला प्रतिक्रिया विचारली असता त्याचे उत्तर देताना रोहित म्हणाला, "हे एक घृणास्पद कृत्य आहे ज्यासाठी कठोर शिक्षा दिली जावी." 

बातम्या आणखी आहेत...