• Rohit's first player in T 1 to score 2500+ in the world; India lost Bangladesh by eight wickets in the second match

टी-२० मालिका / रोहित टी-२० मध्ये २५००+ धावा करणारा जगातील पहिला खेळाडू; भारताने दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला आठ गड्यांनी हरवले

रोहत-शिखरने ११८ धावांची सलामी दिली. जगात कोणत्याच जोडीने टी-२० मध्ये ४ वेळा शतकी भागीदारी केली नाही. रोहत-शिखरने ११८ धावांची सलामी दिली. जगात कोणत्याच जोडीने टी-२० मध्ये ४ वेळा शतकी भागीदारी केली नाही.

रोहितने २२ व्या वेळी ५० पेक्षा अधिक धावा केल्या, विराट कोहलीशी बरोबरी
 

दिव्य मराठी नेटवर्क

Nov 08,2019 09:07:00 AM IST

राजकोट - रोहित शर्मा (८५) टी-२० क्रिकेटमध्ये २५०० पेक्षा अधिक धावा करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. रोहितचे टी-२० मध्ये २५३७ धावा झाल्या. रोहितने २२ व्या वेळी ५० पेक्षा अधिक धावा केल्या. त्याने या बाबतीत कोहली बरोबरी साधली. बांगलादेशने प्रथम खेळताना ६ बाद १५३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १५.४ षटकांत २ गडी गमावत १५४ धावा करत विजय साकारला. रोहित सामनावीर ठरला. मालिकेत संघाने १-१ ने बरोबरी साधली. अखेरचा सामना १० नोव्हेंबर रोजी नागपूर येथे खेळवला जाईल.


आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने वेगवान सुरुवात केली. रोहित आणि धवनने (३१) पहिल्या गड्यासाठी १०.५ षटकांत ११८ धावा केल्या. रोहितने डावात ६ चौकार व ६ षटकार खेचले. श्रेयस अय्यर २४ आणि राहुल ८ धावांवर नाबाद राहिला. लेग स्पिनर अमीनुल इस्लामने २ विकेट घेतल्या. यापूर्वी रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नईम (३६) आणि लिटन दासने (२९) पहिल्या विकेटसाठी ७.२ षटकांत ६० धावा जोडल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सौम्य सरकारने ३० धावा काढल्या. अखेर कर्णधार महमुदुल्लाहने (३०) वेगवान खेळी करत १४० धावांच्या पुढे नेले. वेगवान गोलंदाज दीपक चाहर, खलील अहमद आणि ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने एक-एक बळी घेतले.

कर्णधार म्हणून सहाव्यांदा ५० पेक्षा अधिक धावा

> रोहितने कर्णधार म्हणून टी-२० मध्ये सहाव्यांदा ५० पेक्षा अधिक धावा केल्या. कोहलीने सहा वेळा अशी कामगिरी केली.

> रोहित व धवनने चौथ्यांदा शतकी भागीदारी केली. जगात एकमेव जोडी

> रोहितने दहाव्यांदा ७५ पेक्षा अधिक धावा केल्या. वेस्ट इंडीजचा क्रिस गेल (८) दुसऱ्या स्थानी आहे.

> पाठलाग करताना टीम इंडियाचा सर्वाधिक ४१ वा विजय. ऑस्ट्रेलियन टीम (४०) दुसऱ्या स्थानी.

> सलामीवीर म्हणून रोहितच्या (२०६१) २००० पेक्षा अधिक धावा झाल्या २०१९ मध्ये. सेहवागची (२२५५) २००८ मध्ये अशी कामगिरी

३ प्रकारात ३ भारतीय, ज्यांनी १०० व्या सामन्यात खेळताना नेतृत्व केले

कसोटी (१७ ऑक्टोबर १९८४) : कर्णधार सुनील गावसकरने पाकिस्तान विरुद्ध पहिल्या डावात ४८ आणि दुसऱ्या डावात ३७ धावा काढल्या. हा सामना बराेबरी सुटला.

वनडे ( २० मार्च १९८७) : कर्णधार कपिल देवने पाकिस्तान विरुद्ध ५९ धावा केल्या, एक बळी घेतला. दोन्ही संघांनी ४४ षटकानंतर २१२ धावा केल्या होत्या. कमी गडी गमावल्याने भारत विजयी.

टी20 ( ७ नोव्हेंबर २०१९)

कर्णधार रोहित शर्माने बांगलादेश विरुद्ध टी-२० करिअरचा १०० वा सामना खेळला. ८५ धावा केल्या. भारत आठ गड्यांनी विजयी.

X
रोहत-शिखरने ११८ धावांची सलामी दिली. जगात कोणत्याच जोडीने टी-२० मध्ये ४ वेळा शतकी भागीदारी केली नाही.रोहत-शिखरने ११८ धावांची सलामी दिली. जगात कोणत्याच जोडीने टी-२० मध्ये ४ वेळा शतकी भागीदारी केली नाही.
COMMENT