आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रोहतक (हरियाणा) - रोहतकमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री एका पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. महिला माहेरी राहत होती. सोमवारी रात्री तिचा पती तिला डिनरच्या बहाण्याने घेऊन गेला होता. सकाळपर्यंत दोघेही परतले नाहीत म्हणून शोधाशोध सुरू झाली, तेव्हा शेतातील एका घरात महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला. तिच्या पोट, छाती आणि मानेवर अनेक वार करण्यात आलेले होते. घटनास्थळी पोहोचलेले पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. आरोपी पती सध्या फरार आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, खरावड गावातील रहिवासी पिंकीचे झज्जरच्या सुरेंद्रशी लग्न झाले होते. सुरेंद्र बहादुरगढमधील अग्निशमन विभागात नोकरी करतो. पतीसोबत असलेल्या मतभेदांमुळे ती माहेरी राहत होती. तेथेच एका खासगी रुग्णालयात काम करायची.
पत्नीला डिनरच्या बहाण्याने नेले आणि दिला भयंकर मृत्यू
सोमवारी रात्री पिंकीचा पती भेटायला आला. तो 31 डिसेंबरच्या रात्री डिनर करण्यासाठी तिला घेऊन गेला. त्याने कुटुंबीयांना सांगितले की, डिनरनंतर घराबाहेरच्या रूममध्ये दोघे झोपतील. परंतु रात्री दोघे परतले नाहीत. सकाळी कुटुंबीयांनी शोधाशोध केल्यावर शेतात बनलेल्या एका रूममध्ये पिंकीचा अर्धनग्न मृतदेह आढळला. तिच्या पोट, छाती आणि गळ्यावर चाकूने वार केलेले दिसले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.