आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Romantic Couple Nusrat Jaha And Husband Nikhil Jain Celebrate Their First Karva Chauth, See Photo

रोमँटिक कपल नुसरत जहा आणि पती निखिल जैनने साजरी केली आपली पहिली करवा चौथ, पाहा फोटो  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री नुसरत जहाने आपली पहिली करवा चौथ साजरी केली आहे. नुसरतचे करवा चौथ साजरी करतानाचे काही फोटोज समोर आले आहेत. यावेळी नुसरतने लाल रंगाची साडी नेसली होती. नुसरतने पती निखिल जैनसाठी व्रत केले. निखिल ब्लू कलरच्या कुर्ता - पायजम्यामध्ये दिसला. हे फोटोज नुसरतने आपल्या इंस्टास्टोरीवर शेअर केले आहेत. निखिलने आपल्या हातांनी नुसरतला पाणी पाजले. त्यानंतर त्याने नुसरातला गालावर किसदेखील केले. नुसरतचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. नुसरतसोबतच प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि मीरा राजपूत यांसारख्या अनेक सेलेब्रिटीजने करवा चौथ साजरी केली आहे. सर्वांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...