आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोनाल्डो 700 गोल करणारा एकमेव खेळाडू; मात्र पोर्तुगालचा संघ पराभूत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कीव्ह : क्रिस्टियानो रोनाल्डोने आपल्या विक्रमांच्या पुस्तकात आणखी एक कारनामा जोडला. पोर्तुगालचा फुटबॉलपटू रोनाल्डोने सोमवारी रात्री करिअरचा ७०० वा गोल केला. युरो कप पात्रता सामन्यात युक्रेनविरुद्ध गोल करत हे यश मिळवले. तो ७०० गोल करणारा सध्या खेळत असलेला एकमेव खेळाडू आहे. तो अशी कामगिरी करणारा जागतील सहावा खेळाडू बनला. त्याने ९७३ सामन्यांत हे यश मिळवले. त्याच्या गोलची सरासरी ०.७२ सामने अशी आहे. त्याने ४५८ सामन्यांत कमीत कमी एक गोल केला. या सामन्यात त्याचा संघ युक्रेनविरुद्ध १-२ ने पराभूत झाला. रोनाल्डोने पोर्तुगालाकडून ९५ गोल केले. ताे सर्वाधिक गोलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.

700+ गोल करणारे जगातील सहा खेळाडू
खेळाडू - देश - गोल - वर्ष
बिकेन - ऑस्ट्रिया - 805 24
रोमारियो - ब्राझील - 772 - 22
पेले - ब्राझील - 767 - 20
पुस्कास - हंगेरी - 746 - 23
मुलर - जर्मनी - 735 - 19
रोनाल्डो - पाेर्तुगाल - 700 - 2002- अातापर्यंत
फुटबॉल : पोर्तुगालचा रोनाल्डो ७००+ गोल करणारा जगातील सहावा खेळाडू

राेनाल्डाेने सर्वाधिक गाेल रिअल माद्रिद संघाकडून केले; पाेर्तुगाल संघासाठी अातापर्यंत ९५ गाेल नाेंद
रिअल माद्रिद - सामने 438 - गोल 450
मॅ.युनायटेड - सामने 292 - गोल 118
पाेर्तुगाल - सामने 162 - गोल 95 
युवेंटस - सामने 51 - गोल 32 
स्पोर्टिंग सीपी - सामने 31 - गोल 5

राेनाल्डाेचे हेडरने १२७ व पेनल्टीवर ११३ गाेल
उजवा पाय 442
डावा पाय 129
हेडर 127
इतर 2
इनसाइड द बॉक्स 482
आऊटसाइड द बॉक्स 50
पेनल्टी 113
फ्री किक 55

ला लीगा: सर्वाधिक ३११ गाेल राेनाल्डाेचे
स्पर्धा - गोल
वर्ल्ड कप - 7
चॅम्पियन्स लीग - 127
युरो कप - 9
क्वालिफायर - 57
नेशन्स लीग - 3
कॉन्फेडरेशन्स कप - 2
क्लब वर्ल्ड कप - 8
सुपर कप - 2
ला लिगा - 311
प्रीमियर लीग 84
सीरी ए - 24
प्रीमियर लीगा - 3
इंटरनॅशनल फ्रेंडली - 17
देशांतर्गत कप - 46

वर्णभेदी टिप्पणीमुळे इंग्लंड व बल्गेरिया संघांचा सामना दाेन वेळा थांबला
इंग्लंड टीमला बल्गेरियामध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान चाहत्यांच्या वर्णभेदी टीकेचा सामना करावा लागला. सोफियामध्ये राष्ट्रीय स्टेडियमवर झालेला इंग्लंड-बल्गेरिया सामना या कारणामुळे दोन वेळा थांबवावा लागला. काही चाहते नाझी सॅल्यूट देत होते. पहिल्यांदा सामना २८ व्या मिनिटाला थांबला, तेव्हा इंग्लंड २-० ने पुढे होता. यादरम्यान स्टेडियममध्ये चाहत्यांनी असे पुन्हा केल्यास सामना रद्द करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला या प्रकारामुळे सामना थांबला. त्यानंतर रेफरीने इंग्लंडचे व्यवस्थापक गारेथ साऊथगेटशी चर्चा केली आणि पुन्हा सामना सुरु झाला. हा सामना इंग्लंडने ६-० ने जिंकला. इंग्लंडला दोन आणखी पात्रता सामने खेळायचे आहेत. एक सामना इंग्लंडने जिंकल्यास तो युरो कपसाठी पात्रता मिळवेल. फुटबॉल असोसिएशनचे (एफए) अध्यक्ष ग्रेक क्लार्कने म्हटले की, alt147मीदेखील यासामन्यादरम्यान उपस्थित होतो. ५० पेक्षा जास्त प्रेक्षक ओरडत वर्णभेदी टिप्पणी करत होते. काही विचित्र चेहरे करत होते. मी गारेथशी चर्चा केली व आम्ही सोबत असल्याचे म्हटले. मला अाशा आहे, युरोपियन फुटबॉलची संचालक समिती यूईएफएच्या घटनेची चौकशी करेल.'

रोनाल्डोचे सेविलाविरुद्ध सर्वाधिक क्लब गोल : रोनाल्डोने आपल्या करिअरमध्ये सर्वाधिक २७ क्लब गोल सेविलाविरुद्ध केले. त्यानंतर अॅथलेटिको माद्रिद विरुद्ध २५, गेटाफेविरुद्ध २३, सेल्टा डि विगोविरुद्ध २० आणि बार्सिलोनाविरुद्ध १८ गोल केले.