Home | Khabrein Jara Hat Ke | Room of man was covered in tin foil, after he left the door unlocked

अनेक दिवसांच्या सुट्यांसाठी फिरायला गेला सैनिक, परतला तर पूर्ण सामान केले होते पॅक, नेमके काय झाले ते समजतच नव्हते

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 15, 2019, 12:00 AM IST

जेव्हा सत्य समोर आले तेव्हा त्याला धक्काच बसला, तो म्हणाला-मी याचा बदला नक्की घेईल.

 • Room of man was covered in tin foil, after he left the door unlocked

  स्वानसी - युकेमध्ये राहणाऱ्या एका सैनिकाला त्याची खोली उघडी सोडून जाणे चांगलेच महागात पडले. तो जेव्हा परतला तेव्हा त्याचा घराचे संपूर्ण सामान अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळलेले होते. त्याला वाटले ही हे काम एखाद्या चोराचे असेल जो चोरी करण्याची तयारी करत असेल. पण जेव्हा त्याला खरे काय ते समजले तेव्हा त्याला चांगलेच आश्चर्य झाले. त्याने खोली रिकामी सोडल्याची शिक्षा त्यांना द्यायची होती. पण डॅनियलनेही त्यांच्याकडून बदला घेणार असल्याचे म्हटले आहे.

 • Room of man was covered in tin foil, after he left the door unlocked

  घर उघडे सोडून गेला.. 
  ही स्टोरी वेल्सच्या स्वान्सी शहरात राहणारा सैनिक डॅनियल प्रोथेरो याची आहे. तो नोरफॉकमध्ये एका बराकमध्ये राहतो. डॅनियल नुकताच सुट्यांमध्ये त्याच्या रेजिमेंटसह स्कीइंगच्या ट्रीपवर गेला होता. पण जाताना कुलूप लावायला तो विसरला होता. तो जेव्हा सुट्यांहून परतला तेव्हा त्याच्या घरातील पूर्ण सामान अॅल्युमिनिअम फॉइलने गुंडाळलेले होते. बेडरूमपासून ते बाथरूममध्ये ठेवलेल्या सर्व प्रकारच्या सामानावर कोणीतरी अशाप्रकारे फॉइल गुंडाळलेली होती. शॉवरचे पडदे, टीव्ही, टॉयलेटचे सामानही कोणीतरी पॅक करून गेले होते. बाथरूमचे नळ आणि इतर गोष्टींवरही फॉइल गुंडाळलेली होती. ते पाहून त्याला धक्काच बसला. हे एखाद्या चोराने चोरी करण्यासाठी आला तेव्हा केले असावे असे त्याला वाटले. पण सत्य काही भलतेच होते. 

   
   

 • Room of man was covered in tin foil, after he left the door unlocked

  मित्रांनी शिकवला धडा, डॅनियल म्हणाला, बदला घेईल 
  - डॅनियलच्या गरी कोणताही चोर शिरला नव्हता. तर त्याच्या मित्रांनी हे सर्व केले होते. सुटीवर जाताना घर उघडे ठेवल्याने मित्रांना त्याला धडा शिकवायचा होता. थोड्या वेळाने त्याचा मित्र स्कॉट लुईस (28) तेथे आला आणि त्याने डॅनियलला सर्व सत्य सांगितले. 
  - स्कॉटदेखिल सैनिक आहे. त्याने आणखी एक मित्र टॉम हारकोर्टच्या मदतीने हे सर्व केले होते. घरातील संपूर्ण सामान रॅप करण्यासाठी त्यांना 10 तास लागले होते. सोबतच टीन फॉइलचे सुमारे 30 रोल त्यासाठी वापरावे लागले होते. 
  - स्कॉट म्हणाला की, डेन सुट्यांमध्ये त्याच्या रेजिमेंटसह स्कीइंगसाठी गेला होता. पण तो घर उघडे सोडून गेला. त्यामुळे स्वतःचे सामान सांभाळणे आणि कुलूप लावणे अशा गोष्टींचा धडा शिकवण्यासाठी त्याच्या संपूर्ण सामानावर फॉइल गुंडाळली होती. 
  - घरी परतल्यानंतर डॅनियलला सामानावरून फॉइल हटवण्यासाठी सुमारे तीन तास लागले. पण तेव्हाही संपू्ण सामान स्वच्छ झालेले नव्हते. त्याने फक्त सामानातून फॉइल काढली. ज्याचा वापर अत्यंत गरजेचा होता. 
  - डॅनियलचे म्हणणे होते की, माझ्याकडे रूमची किल्ली नाही म्हणून मी कधीही लॉक करत नाही. या प्रकारानंतर मित्रांचा बदला घेणार असल्याचे तो म्हणाला. 

Trending