आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: महाभारताच्या 'द्रौपदी'ने 3 वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न, घटस्फोटानंतर होती लिव्ह इनमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः टीव्ही अभिनेत्री रुपा गांगुली हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. सुमारे 28 वर्षांपूर्वी बी. आर. चोप्रांच्या गाजलेल्या 'महाभारत' या मालिकेत द्रौपदीची भूमिका वठवून ती घराघरांत प्रसिद्ध झाली होती.रुपा गांगुलीचा जन्म 25 नोव्हेंबर 1966 रोजी कोलकातामध्ये झाला. एकत्र कुटुंबात ती लहानाची मोठी झाली. कोलकाता येथील बेलटाला गर्ल्स हायस्कूलमधून तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोलकाता विद्यापीठातून इतिहास या विषयात पदवी प्राप्त केली. तिने हिंदीसोबतच बंगाली सिनेमा आणि टेलिव्हिजनवर काम केले. द्रौपदीच्या भूमिकेतून प्रसिद्ध झाल्यानंतर तिने गौतम घोष यांच्या 'पोद्मा नोदीर माझी' (1993), अपर्णा सेन यांच्या 'युगांत' (1995) आणि रितुपर्णो घोष यांच्या 'अंतरमहल' (2006) या सिनेमांमध्ये काम केले.

 

तर छोट्या पडद्यावर 'करम अपना अपना', 'लव स्टोरी', 'वक्त बताएगा कौन अपना कौन पराया', 'कस्तूरी' आणि 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' या गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनय केला.

 

खासगी आयुष्यात आले अनेक चढ-उतार
प्रसिद्धी, नाव, पैसा मिळवणा-या रुपाचे खासगी आयुष्य अनेक चढउतारांचे राहिले. रुपा गांगुलीने मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या ध्रुब मुखर्जीसोबत 1992 साली लग्न केले होते. लग्नाच्या चौदा वर्षांनी म्हणजे 2007 मध्ये हे दोघे विभक्त झाले. जानेवारी 2009 मध्ये त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्यांना आकाश नावाचा एक मुलगा आहे.

 

नव-यापासून विभक्त झाल्यानंतर रुपा तिच्यापेक्षा वयाने 13 वर्षे लहान असलेल्या गायक प्रेमी दिब्येंदुसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. मुंबईत हे दोघे एकत्र राहात होते. मात्र लवकरच त्याच्यापासून ती विभक्त झाली.

 

स्टार प्लस वाहिनीवरील गाजलेल्या 'सच का सामना' (2009) या शोमध्ये रुपाने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक रहस्ये उघड केली. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या खासगी आयुष्यातील निवडक गोष्टी सांगत आहोत...


प्रेक्षकांची मिळाली होती पसंतीची पावती...

1988 साली दूरदर्शनवर सुरु झालेल्या 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत रुपा गांगुली द्रौपदीच्या भूमिकेत झळकली होती. बी.आर. चोप्रा यांच्या या मालिकेमुळे रुपा अचानक प्रसिद्धीझोतात आली होती. द्रौपदीच्या भूमिकेमुळे नाव, प्रसिद्धी, पैसा कमावणा-या रुपाला मात्र ती एक चांगली अभिनेत्री नसल्याचे वाटत होते. रुपाच्या मते, अभिनय कसा करावा, हे तिला ठाऊक नव्हते, मात्र प्रत्यक्षात ती द्रौपदीची भूमिका साकारत होती. शिवाय तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंतीची पावतीसुद्धा मिळत होती.

 

अपघाताने आली अभिनय क्षेत्रात...  
रुपा गांगुलीला टेलीवूडमधील अनेक मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. रुपा गांगुलीने सांगितले, की तिने अभिनेत्री होण्याचा विचार कधीच केला नव्हता. मात्र अपघाताने ती या क्षेत्रात आली. द्रौपदीची भूमिका मिळवण्यासाठी तिला बरेच कष्ट घ्यावे लागले होते.
 
अनेक सिनेमांमध्ये झळकली आहे रुपा...
रुपा बॉलिवूडमध्ये 'साहेब' (1985), 'एक दिन अचानक' (1989), 'प्यार के देवता' (1990), 'बहार आने तक' (1990), 'सौगंध' (1991), 'निश्चय' (1992) आणि 'बर्फी' (2012) या सिनेमांमध्ये झळकली आहे.

 

उत्तम गायिका आहे रुपा गांगुली... 

रुपा गांगुली एक चांगली गायिकासुद्धा आहे. तिला पार्श्वगायनासाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय 2012 मध्ये Abosheshey या बंगाली सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.  

 

तीन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न...
रुपाने आपल्या खासगी आयुष्यात अनेक चढउतार बघितले. वैवाहिक आयुष्यात तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या कारणामुळे ती आपल्या पतीपासून विभक्त झाली आणि काही वर्षांत घटस्फोट घेतला. खरं तर रुपाने आपल्या पतीसाठी अभिनयाला रामराम ठोकला होता आणि लग्नानंतर ती त्याच्याबरोबर कोलकत्याला स्थायिक झाली होती. ती लग्नानंतर हाऊसवाईफ झाली. मात्र तिला तिच्या दैनंदिन खर्चासाठी नव-याकडून पैसे मिळत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात खटके उडायचे. रोजच्या त्रासाला कंटाळून रुपाने तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

 

विवाहबाह्य होते संबंध .... 
'सच का सामना' या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर रुपाने आपल्या खासगी आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी उघड केल्या. रुपाने सांगितले, की तिचे विवाहबाह्य संबंध होते. याशिवाय आपण तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे तिने या कार्यक्रमात सांगितले होते. एवढी वर्षे आपल्या मनात दाबून ठेवलेल्या गोष्टी उघड केल्याने समाधानी वाटत असल्याचे तिने यावेळी म्हटले होते.

 

जुलै 2017 मध्ये पडली होती घरावर धाड... 
पश्चिम बंगाल सरकारच्या सीआयडी पोलिसांनी याचवर्षी जुलै महिन्यात भाजप खासदार असलेल्या रुपा गांगुलीच्या घरावर धाड टाकली होती. रुपा गांगुलीचे नाव मानवी तस्करी प्रकरणात पुढे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. स्थानिक सीआयडीने यासंदर्भात रुपा गांगुलीला नोटीसही पाठवली होती. ही कारवाई चाईल्ड ट्रफिकिंग रॅकेटसंबंधी रुपा गांगुलीची चौकशी करण्यासाठी झाली होती. पोलीस चौकशीदरम्यान या चाईल्ड ट्रफिकिंग रॅकेटमधील मुख्य आरोपी चंदना चक्रवर्ती आणि जुही चौधरी यांनी रुपा गांगुलीचे नाव घेतल्यानंतर रुपा गांगुलीला प्रदेश भाजपच्या महिला अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. पश्चिम बंगाल सरकारची ही कारवाई वैयक्तिक आकसापोटीच होत असल्याचा आरोप भाजप खासदार रुपा गांगुलीने केला होता.

बातम्या आणखी आहेत...