आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ यात्रेसाठी आरओपी आता २४ तास राहील तैनात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेच्या दरम्यान दीड महिन्यासाठी रोड ऑपरेशन पार्टी (आरओपी) १० तासांएेवजी २४ तास तैनात करण्यात येणार आहे. पुलवामा येथील सीआरपीएफच्या हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.


जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हामार्गावर आरआेपी असेल तरच सैन्यदल आणि शासकीय संस्थांची कारवाई होते. पुलवामा येथील सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावरील हल्यानंतर सर्व महत्वाच्या रस्त्यांवर आरआेपी दहा तासांसाठी तैनात करण्यात येत होती. आता अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी २४ तास आरओपी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


काय आहे आरओपी : आरओपी म्हणजे ( रोड ऑपरेशन पार्टी ) रस्ता सुरक्षा तुकडी. महत्वाच्या रस्त्यावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ या कालावधीत ही तुकडी काम करते. जम्मू ते श्रीनगर या ३५० कि. मी. मार्गावर प्रत्येक शंभर मीटरवर दोन ते तीन जवान तैनात केले जातात. तुकडी तैनात केल्यानंतरच जम्मू येथून एकाच वेळी जवानांच्या शंभर गाड्या निघतात. अशाच प्रकारे श्रीनगर ते पुढच्या महत्वाच्या मार्गावर तुकडी तैनात केली जाते. 


आरओपीमध्ये सैन्य, बीएसएफ, एसएसबी, आयटीबी, सीआरपीएफ आदींचे जवान असतात. हे जवान दहा तास ड्युटी करतात. आरआेपीमधील जवानाजवळ पंधरा किलो वजनाची रायफल, दारूगोळा, बुलेट, पंधरा किलो वजनाचे बुलेटप्रूफ जाकीट, पायाच्या सुरक्षेसाठी पॅड, बूट, बुलेटप्रुफ टोपी आणि तोंडाला गुंडाळलेला रूमाल असे साहित्य असते.

बातम्या आणखी आहेत...