आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक..औरंगाबादेत प्रातर्विधीसाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलीला दोघांनी उचलून नेऊन अंधारात केला बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रातर्विधीसाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलीला दोघांनी उचलून नेऊन अंधारात तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  सोमवारी (ता.14) सायंकाळी शहरातील सिडकोमधील आंबेडकरनगरजवळ ही घटना घडली. यातील एका अल्पवयीन संशयित आरोपीला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा साथीदार फरार आहे. आधी सिडको पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा हद्दीचा मुद्दा लक्षात आल्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

 

सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. आई आजारी असल्याने तिने सहा महिन्यांपासून शाळा सोडून दिली असून ती आईला घरकामात मदत करते. सोमवारी सायंकाळी ती प्रातर्विधीसाठी ग्रिव्हज कॉटन कंपनीजवळच्या मैदानाकडे गेली असता आंबेडकरनगरातच राहणारे दोघे दुचाकीवर आले. त्यांनी तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून दूर अंधारात नेले आणि तिच्यावर अत्याचार करून पळ काढला. रात्री पीडितेचे आई-वडील सिडको पोलिस ठाण्यात आले. पीडितेची वैद्यकीय तपासणी झाल्यावर मंगळवारी गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, डीबी पथकाचे भारत पाचोळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. डीबी पथकाचे उपनिरीक्षक भारत पाचोळे यांनी मध्यरात्रीच शोधमोहीम राबवत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. सचिन (20) नावाच्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...