आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसळलेल्या ज्वालामुखीमुळे १८०० फुटांवरून रोप वॉक, ३१ मिनिटे २३ सेकंदांचा विक्रम

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • धुरापासून बचावासाठी गॅस मास्क व चष्मा

निकारागुवा - अमेरिकेतील ४१ वर्षीय ‘खतरों के खिलाडी’ निक वॉलेंडा यांनी निकारागुवामध्ये उसळलेला ज्वालामुखी मसायाच्यावर रोप वॉकचा विक्रम केला आहे.  या स्टंटसाठी ज्वालामुखीचे विवर माऊथ ऑफ हेलपासून १८०० फूट उंचीवर एक दोरखंड बांधण्यात आला होता. त्यांना हा विवर ३१ मिनिटे २३ सेकंदांत ओलांडला. निक असा स्टंट करणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत. ज्वालामुखीजवळ राहणे धोकादायक असते. कारण त्यातून निघणारा लाव्हा व विषारी वायू प्राणघातक असतो. धुरापासून बचावासाठी गॅस मास्क व चष्मा


निक यांनी ज्वालामुखीच्या धुरापासून बचाव करण्यासाठी गॅस मास्क हार्नेस व डोळ्यावर चष्मा वापरला. ज्वालामुखीपासून निघालेल्या गरम हवेपासून बचाव करण्यासाठी निक यांनी खास प्रकारचे बूट वापरले होते. या वेळी निक यांना वेगवान वाऱ्याचाही त्रास झाला.

बातम्या आणखी आहेत...