आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतापगडाचा वारसा पाहण्यासाठी २१० कोटी खर्चून रोपवेचा मार्ग, मात्र पर्यावरणाच्या वैभवाला नख लागण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - घनदाट जंगल असलेल्या ऐतिहासिक जावळीच्या खाेऱ्यात महाबळेश्वर ते प्रतापगड किल्ल्यादरम्यान २१० कोटी रुपयांचा ‘महाप्रताप केबल कार प्रकल्प’ प्रस्तावित आहे. राेपवेमुळे २४ किमीचे अंतर केवळ ६ किमीवर येईल. महाबळेश्वरला वर्षाला १६ ते १८ लाख पर्यटक भेट देतात. पर्यटकांची संख्या वाढत असल्याने पायाभूत साेयी-सुविधांवर ताण निर्माण हाेण्यासाेबतच प्रदूषण आणि पर्यावरणाच्या समस्या उद््भवू शकतात. या पार्श्वभूमीवर केबल कार प्रकल्प वन विभागाच्या आरक्षित जंगलातून जाणार असल्याने निसर्गाचे काय, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.

 

या सुविधा उभारल्या जाणार
काेल्हापूरच्या सायाे इन्फ्राने प्रकल्प अहवाल शासनाला सादर केला आहे. कंपनीने जावळीत २१ एकर जागा विकत घेतली आहे. तेथे राेपवेचे थांबे, अाॅडिटाेरियम, म्युझियम, रेस्टाॅरंट, फूड माॅल, पार्किंग, कार्यालय, टाॅयलेट, वेटिंग रूम, घरे, तिकीट काउंटर अादी गाेष्टी विकसित केल्या जाणार आहे.

 

मात्र असे आहेत आक्षेप  
सह्याद्री घाटमाथा जैवविविधतेने समृद्ध आहे. मात्र, रोपवेमुळे गर्दी वाढून जंगल व प्राणी-पक्ष्यांच्या अस्तित्वावर परिणाम होईल, असा अाक्षेप पर्यावरणप्रेमी घेत अाहेत. तर, प्रतापगडला जाण्यासाठी केबल कार वापरल्यास रस्ते वाहतूक कमी हाेऊन कार्बन उत्सर्जन कमी हाेईल, असाही युक्तिवाद होत आहे. 

 

महाबळेश्वर ५ नद्यांचे उमगस्थान, गर्दी वाढल्यास दुष्परिणाम
बॉम्बे एन्व्हायर्नमेंट अॅक्शन ग्रुप या संस्थेच्या हेमा रमणी म्हणाल्या, पर्यटक वाढवण्यासाठी जावळी खोऱ्यातील वने वेठीस न धरता किल्ल्याजवळ रोपवे करावा. महाबळेश्वरपासून किल्ला फार दूर नसून नाहक कोट्यवधी रुपये रोपवेवर खर्चले जाऊ नयेत. महाबळेश्वरमध्ये ५ नद्यांचा उगम होतो. पर्यटक वाढल्यानंतर त्यावर परिणाम होईल. 

 

करांत सवलत द्या : कंपनी
कंपनीने भाडेतत्त्वावर घाटमाथ्यावरील वन खात्याच्या जमिनीची मागणी केली अाहे. राेपवेसाठी संरक्षित वन जागेत २० टाॅवर उभारले जातील. अखंडित वीज मिळण्याची तरतूद व करांत सवलत देण्याचेही सूचित केले अाहे. यंत्रणा परदेशातून येणार असल्याने कस्टम ड्यूटी माफ करण्याचीही मागणी आहे. 

 

२ वर्षांत प्रकल्प कार्यान्वित
सायाे इन्फ्राेचे सीईअाे नामदेव चव्हाण म्हणाले, शासनाच्या विविध विभागांच्या १० एनअाेसी मिळाल्या असून पर्यावरण खात्याच्या परवानगीचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाने प्रकल्पास प्रायाेगिक मान्यता दिली असून पर्यावरणमंत्र्यांनी मेगास्टेट्सचा दर्जा दिला अाहे. २ वर्षांत प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे.

 

> अहवाल सादर नाही : महाबळेश्वर पाचगणी उच्चस्तरीय संनियंत्रण समितीचे तज्ज्ञ सदस्य डाॅ.राहुल मुंगीकर म्हणाले,  प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु नंतर काेणतीही माहिती या प्रकल्पाच्या बाबतीत विकासकाने दिली नाही. पुढे त्यावर कामही झाले नसल्याचे दिसते.

 

> वन अधिकाऱ्याकडे प्रकल्पाचा प्रस्ताव नाही : सातारा वन विभागाचे उप वन संरक्षक भारत सिंह हाडा म्हणाले, राेपवेच्या परवानगीसाठीची फाइल अद्याप अापल्याकडे अालेली नाही. प्रस्ताव अाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला जाईल. संरक्षित वनावर काेणता परिणाम हाेऊ शकेल याबाबत अाढावा घेण्यात येईल.  

इकाे-टुरिझमअंतर्गत 5700 मीटर लांब राेपवे

> 600 ते 900 पर्यटक ताशी ये-जा करू शकतील 

> 8,100 पर्यटक दररोज या राेपवेचा वापर करतील

> 18 लाख पर्यटक येतात महाबळेश्वरला, 150 किमी परिसर आहे दाट वनक्षेत्राचा

> महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांपैकी फक्त 5 ते 7% लोक गडाला भेट देतात

 

फेज-1:  2.75 किमी महाबळेश्वर ते जावळी

फेज-2 :  2.95 किमी जावळी ते प्रतापगड

बातम्या आणखी आहेत...