• Home
  • News
  • Roshan family is again in trouble, sunaina's boyfriend said, 'I will not say anything'

Bollywood / कौटुंबिक वादामुळे रोशन कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत, सुनैनाचा कथित प्रेमी म्हणाला - 'मी काहीच बोलणार नाही' 

चुकीच्या निर्णयामुळे याआधीही सुनैना अडकली होती 

दिव्य मराठी वेब

Jun 22,2019 11:20:00 AM IST

एंटरटेनमेंट डेस्क : हृतिक रोशन आणि त्याचे कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. त्याची बहीण सुनैना रोशन रुहेल अमीन नावाच्या मुलावर प्रेम करते, मात्र तिच्या आई-वडिलांना ते मान्य नाही. यावर सोनुप सहदेवनी यांचा रिपोर्ट. नुकताच रुहेलने त्याचा आणि सुनैनाचा एक फोटो शेअर केला होता, त्यात त्याने सुनैनाला बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर सांगितले होते.

सुनैना रोशनविषयी दैनिक भास्करने रुहेल अमीनसोबत चर्चा केली...
दैनिक भास्करने जेव्हा रुहेलला या पूर्ण प्रकरणाविषयी विचारलेे तर तो म्हणाला, "मी या विषयावर काहीच बोलू इच्छित नाही. खरे सर्वांसमोर आले आहे. मी प्रकरणावर आणखी काहीच बाेलणार नाही. मीदेखील एक पत्रकार आहे. त्यामुळे मी या प्रकरणावर काहीच मत मांडणार नाही. मला माफ करा, मात्र मी या विषयावर काहीच बोलू शकत नाही."

दुसरीकडे भाऊ हृतिकदेखील या घडीला मला साथ देत नसल्याचे सुनैना म्हणाली. वडील राकेश रोशनच्या दबावामुळे तो मदत करत नसल्याचे तिचे म्हणणे आहे. सुनैनाचे हे वक्तव्य चकित करणारे आहे, कारण सुनैना आणि हृतिकमध्ये चांगले नाते आहे. हृतिकनेच आपल्या बहिणीला डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी मेहनत घेतली.

चुकीच्या निर्णयामुळे याआधीही सुनैना अडकली होती...
सूत्रानुसार, हृतिकच्या कुटुंबाला रुहेलची पार्श्वभूमी आवडत नाही. आपली मुलगी चुकीच्या नात्यात अडकू नये, तिची फसवणूक होऊ नये, अशी भीती तिच्या कुटुंबीयांना वाटते. सूत्रानुसार, सुनैना याआधीही चुकीच्या नात्यात अडकली होती. त्याचा तिला मानसिक त्रासही झाला होता.

सुजैनने घेतली कुटुंबाची बाजू...
सुजैनने राेशन कुटुंबाची बाजू घेतली आहे. हृतिकची पूर्व पत्नी सुजैन रोशन कुटुंबासाठी धावून आली आहे. याबरोबरच हृतिकची चुलत बहीण एहसानदेखील कुटुुंबासाेबत उभी राहिली. त्यांनी कंगना आणि रंगोली यांनाच ऐकवले.

कोण आहे रुहेल अमीन...
रुहेल काश्मिरी आहे व व्यवसायाने पत्रकार आहे. त्याचे लग्न झाल्याची चर्चा आहे, मात्र याविषयी पक्की माहिती नाही. रुहेल आणि सुनैना यांची मैत्री फेसबुकवर झाली होती.

X
COMMENT