आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्राइस्टचर्च - न्यूझीलंडच्या समुद्र किनाऱ्यावर एका अनोळखी प्राण्याचा सापळा आढळला. सुरुवातीला लोक याला एलियन समजत होते, पण नंतर शास्त्रज्ञांनी हा सापळा कशाचा आहे ते शोधले. या सापळ्याला दोन पाय, एक शेपटी, दोन टोकदार दात आणि पंख दिसत आहेत. त्याच्या डोक्यावर एक टोकदार शिंगासारखा अवयवही आहे.
काय आहे प्रकरण..
- क्राइस्टचर्चच्या हॅना मेरी आणि त्यांची आई यांना समुद्र किनाऱ्यावर फिरताना हा सापळा आढळला होता. हा सापळा एखाद्या एलियनचा असेल असे त्यांना वाटले.
- त्यांनी सांगितले की, तो सापळा एवढा भितीदायक होता की, त्याला हात लावायलाही भीती वाटत होती. त्यांनी त्याचा फोटो फेसबूकवर अपलोड केला आणि मित्रांना हे काय आहे असे विचारले.
- लोक त्यावर विचित्र नावे सांगत कमेंट करत होते. पण खोल समुद्रातील हा एखादा जीव असावा अशी शक्यता हॅनाने व्यक्त केली.
काय म्हणतात शास्त्रज्ञ
- नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वाटर अँड अॅटमॉसफेरिक रिसर्चचे तज्ज्ञ डॉक्टर मॅल्कम फ्रान्सिस यांनी सांगितले की, बरीच चौकसी केल्यानंतर हा सापळा मेल डिपरस नसटस म्हणजे न्यूझीलंड रफ स्कॅटचा आहे.
- सापळ्याच्या पंखावरील पंजांना अलार स्पाइन्स म्हटले जाते. याचा वापर फिमेलबरोबर मेटिंग करण्यासाठी वापरला जातो.
- हा एक प्रकारचा मासा असतो. त्याच हाडाऐवजी लवचिक सापळा असतो. तर याच्या छातीला एक कवच असते ते डोक्याला जोडलेले असते.
- हा प्राणी मानवासाठी धोकादायक असतो. पण त्याचे पंख खाल्ले जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.