आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाच्या आठ सेंमी लांब दाताचे अडीच तासांत रूट कॅनॉल...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनमधील डेवानच्या पँटन प्राणिसंग्रहालयात ११ वर्षांच्या वाघाचे ८ सेंमी लांबीच्या दातावर रूट कॅनॉल करण्यात आले. या प्रक्रियेत व्हेटरनरी डॉक्टर जो रेनयॉर्ड व त्यांच्या पथकास अडीच तास लागले. १०० किलो वजनाच्या वाघाचे नाव फेबी आहे. त्याला ३०  दात आहेत. 
यातील चार खूपच लांब आणि टोकदार होते. काही दिवसांपूर्वी फेबीच्या जबड्याच्या खालचा दात (कॅनाइन)फ्रॅक्चर झाला होता. हा दात ३.१५ इंच लांब होता. डॉ. जो रेययॉर्ड यांनी सांगितले, त्यात पस सुरू झाला होता. यासाठी रूट कॅनॉल करण्याची गरज होती. वाघाच्या दातांवर रूट कॅनॉल करणे खूप आव्हानात्मक होते. त्याला शुद्ध आली होती. पण निभावले. 

डॉ. जो यांनी सांगितले, शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधी वाघाच्या गुहेत जाऊन खास शस्त्रक्रियागार बनवले. गवत आणि ताडपत्री टाकून टेबल तयार करण्यात आले. दंतवैद्यांनी एक विशेष सर्जिकल किट व हाताने चालणारे रेडिओग्राफिक उपकरण आणले. शस्त्रक्रियेच्या वेळी ३ व्हेटरनरी डॉक्टर, ३ परिचारिका व प्राणी संग्रहालयातील वरिष्ठ कर्मचारी व वाघांची देखभाल करणारे तीन केअरटेकर हजर होते. त्याला आधी अॅनस्थेशिया देण्यासाठी त्याच्या शिरेत इंजेक्शन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...