Home | Sports | From The Field | Royal Challengers Bangalore fourth victory against KXIP

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चौथा विजय; डिव्हिलर्स-स्टोइनिसची शतकी भागीदारी

वृत्तसंस्था | Update - Apr 25, 2019, 09:31 AM IST

तालिकेत बंंगळुरू सातव्या स्थानावर आणि पंजाब पाचव्या स्थानावर

  • Royal Challengers Bangalore fourth victory against KXIP

    बंगळुरू - स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स (नाबाद ८२) आणि मार्क्स स्टोइनिस (नाबाद ४६) यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर आयपीएल १२ च्या सत्रात १७ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ४ बाद २०२ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात किंग्ज इलेव्हन पंजाब २० षटकांत ७ बाद १८५ धावा करू शकला. स्टार फलंदाज डिव्हिलियर्स सामनावीर ठरला.


    बुधवारी बंगळुरूच्या डिव्हिलियर्सने ४४ चेंडूंत नाबाद ८२ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ३ चौकार व ७ षटकार खेचले. त्याने १९ व्या षटकांत मो. शमीला ३ षटकारांसह २१ धावा चोपल्या. त्याला साथ देत स्टोइनिसने ३४ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार खेचत नाबाद ४६ धावा काढल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६६ चेंडूंत १२१ धावांची तुफानी अभेद्य भागीदारी रचली. या दोघांनी बंगळुरूसाठी अखेरच्या तीन षटकांत ६४ धावांचा पाऊस पाडला. डिव्हिलियर्सचे आयपीएलमधील हे ३३ वे अर्धशतक ठरले. पार्थिव पटेलने २४ चेंडूत ४३ धावा काढल्या. कर्णधार विराट कोहली १३, मोईन अली ४ व अकसदीप नाथ अवघ्या ३ धावांवर परतले. पंजाबकडून आर. अश्विन, शमी, एम. अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

    पुरनची एकाकी झूंज :

    पंजाबकडून पुरनने एकाकी लढत देत २८ चेंडूत सर्वाधिक ४६ धावा केल्या. मिलरने २४, मयंक अग्रवालने ३५, क्रिस गेलने २३ आणि लोकेश राहुलने ४२ धावा काढल्या. बंगळुरूच्या उमेश यादवने ३६ धावांत ३ बळी घेतले. नवदीप सैनीने २ आणि मोईन अली व स्टोइनिसने प्रत्येकी एकाला टिपले.

Trending