आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑटो डेस्क- रॉयल एनफील्डनने क्लासिक 500 ट्रिब्यूट ब्लॅक नावाने लिमीटेड एडिशन लॉन्च केले आहे. याची विक्री 10 फेब्रुवारीपासून होईल. याची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. कंपनी आता 500cc इंजिन असलेल्या बुलेटचे प्रोडक्शन बंद करणार आहे. त्यामुळेच कंपनी क्लासिक 500 चे ट्रिब्यूट एडिशन लॉन्च करणार आहे. भारतीय बाजारात आता क्लासिक 500, बुलेट 500 आणि थंडरबर्ड 500 मिळणार नाहीत.
रॉयल एनफील्डन क्लासिक 500 ट्रिब्यूट ब्लॅकचे इंजिन
या बुलेटमध्ये 499cc चे इंजिन आहे, जे 27.2bhp पॉवर आणि 41.3Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. हे इंजिन BS4 एमिशन नॉर्म्सच्या अनुरूप आहे. हे लिमीटेड एडिशन मॉडल कंपनीचे 500cc इंजिन असलेले शेवटचे आहे. याच्या सर्व यूनिटवर 'एंड ऑफ बिल्ट' सीरियल नंबर असेल.
भारताच्या बाहेर मिळणार
1 एप्रिल, 2020 पासून भारतीय बाजारात BS6 इंजिन असलेल्या गाड्याच विक्री केल्या जातील. यात रॉयल एनफील्डच्या 500cc बुलेटची विक्री 31 मार्चपासून बंद होणार आहे. पण, भारताबाहेर या बुलेट मिळत राहतील. भारतात या बुलेटचे सर्विसींग पार्ट मिळत राहतील. रॉयल एनफील्डने 2008 मध्ये क्लासिक 500 बुलेट लॉन्च केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.