आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉयल एनफील्डचा नवीन लूक पाहा; या कंपनीने बाइकला केले मॉडिफाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सध्या रॉयल एनफील्ड बाइकला मॉडिफाय करण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे. अनेक वर्षांआधी जुन्या ब्रँडच्या बाइकला मॉडिफाय केले जात होते. परंतू 650 ट्विन्सनंतर परत एकदा बाइकला मॉडिफाय करण्याची क्रेझ सुरू झाली आहे.

 

रॉयल एनफील्डच्या बाइकला ही कंपनी करते मॉडिफाय
भारतात अनेक ठिकाणी गाड्या मॉडिफाय करण्याचे गॅरेज आहे. त्यातील बहुतेक गॅरेज रॉयल एनफील्डला अनेक डिझाइनमध्ये मॉडिफाय करत असतात. 'Bulleteer Customs' ही कंपनी रॉयल एनफील्डच्या बाइकला मॉडिफाय करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या 'Bulleteer Customs'ने मॉडिफाय केलेल्या रॉयल एनफील्ड बाइकची जोरदार चर्चा सुरू आहे. कंपनीने रॉयल एनफील्डला एका भारतीय कर्नलसाठी मॉडिफाय केले आहे.

 

तोफेच्या रूपात डब
'Bulleteer Customs'कंपनीने तयार केलेल्या बाइकचे नाव 'Dubbed as the Cannonade' असे ठेवण्यात आले आहे. या शब्दाचा अर्थ तोफेच्या रुपात डब असा होतो. या बाइकवर नजर फिरवताच हे नाव या बाइकसाठी योग्य असल्याचे जाणवते. 'Bulleteer Customs'च्या मते, ही बाइक भारतीय सेनेतील एका कर्नलसाटी तयार करण्यात आली आहे. 

 

बाइकच्या टाकीवर आहे अद्भूत दृश्य
या बाइकच्या पेट्रोल टाकीवर कलेचा एक सुंदर नमुना तयार करण्यात आला आहे. टाकीवर भारतीय सेनेचे प्रतीक चिन्ह तयार करण्यात आले आहे. त्यासोबतच गडद हिरव्या रंगाच्या टाकीवर पिवळ्या रंगाच्या सिमा रेखा रेखाटण्यात आल्या आहे. टाकीच्या दोन्ही बाजूंवर महत्वाचे शब्द आणि काही तारखा छापण्यात आल्या आहे. 

 

हँडलबार मध्ये केले बदल
बाइकच्या हँडल बारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बाइकच्या दोन्ही टायरला स्टाइलिश लूक देण्यासाठी मल्टी-स्पोक रिम्सचा वापर करण्यात आला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...