आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या पाकिस्तानात नामशेष झाले हिंदू, तेथे एवढ्या रुबाबात राहतो हा राजपूत राजा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करणीसिंह यांच्या पत्नी या राजस्थानातील राजकुमारी पद्मिनी आहेत. - Divya Marathi
करणीसिंह यांच्या पत्नी या राजस्थानातील राजकुमारी पद्मिनी आहेत.

इंटरनॅशनल डेस्क- भारताला महासत्ता होण्यासाठी पाकिस्तानची साथ असणे गरजेचे आहे. दोन्ही देशांनी मैत्रीपूर्ण भावनेने एकत्र येऊन समस्येवर तोडगा शोधला पाहिजे, अशी दोन्ही देशांतील सामान्य जनांची आहे. पाकिस्तानमधील अमरकोट संस्थानचे राणा हमीरसिंह यांनाही असेच वाटते. राणा हमीरसिंह हे पाकिस्तानातील बडे प्रस्थ आहे. पाकिस्तानातील माझ्यासह सर्व हिंदूंची सुरक्षा पाकिस्तानातील मुस्लिम लोकच करतात असे सांगतात. तसेच त्यांच्या बॉडीगार्डकडे AK-47 रायफल्स आहेत.

 

भारत-पाकिस्तानबाबत काय म्हणणे आहे हमीरसिंह यांचे-
- हमीरसिंह हे भारताचे पंतप्रधान मोदींबाबत आशावादी आहेत. मोदींनी पाकिस्तानशी संबंध सुधारावेत म्हणून प्रयत्न केल्याचे ते सांगतात.
- दोन्ही देश आपसात लढत राहिले तर तिस-याचा (चीन, अमेरिका) फायदा होईल असे सूचवतात.
- भारत-पाक या दोघांनी मित्र म्हणून एकत्र बसून समस्येवर उत्तर शोधले पाहिजे.
- पाकिस्तानमध्ये 97 टक्के मुस्लिम आणि फक्त तीन टक्के इतर धर्मिय आहेत. या सर्वांची सुरक्षा पाकिस्तानातील मुस्लिम करतात.
- पाकिस्तानातील मुस्लिम स्वतःला जेमरचा राजा पोरसचे वंशज मानतात.
- हमीरसिंहाचे कुलदैवत हिंगलाज मंदिराची सुरक्षाही मुस्लिमांकडेच असल्याचे ते सांगतात. 
- भारतातही मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदतात, राहतात याकडे ते लक्ष वेधतात.
- दोन्ही देशांतील सामान्य लोकांप्रमाणेच त्यांचीही इच्छा आहे की भारत-पाक यांच्यात चांगले मैत्रीपूर्ण संबंध असावेत.

 

कोण आहेत हमीरसिंह-
- हमीरसिंह यांच्या कुटुंबाचे पाकिस्तानातील राजकारणात वजन आहे.
- त्यांचे वडील राणा चंद्रसिंह अमरकोटचे राजे होते.
- चंद्रसिंह सात वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री होते. त्यांचे पाकचे माजी पंतप्रधान जुल्फीकार अली भुट्टोंसबत मैत्रीचे संबंध होते.
- पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) मधून वेगळे झाल्यानंतर राणा चंद्रसिंह यांनी पाकिस्तान हिंदू पार्टी स्थापन केली होती. त्यांचा झेंडा भगवा होता.
- त्यात ओम आणि त्रिशूल होते. त्यांचे 2009 मध्ये निधन झाले.

 

भारतीय आहे हमीरसिंहची सून-
- 20 फेब्रुवारी 2015 रोजी हमीरसिंह यांच्या मुलाचा विवाह राजस्थानच्या पद्मिनीसोबत झाला होता.
- वऱ्हाड पाकिस्तानच्या अमरकोट संस्थानातून भारतात आले होते.
- वर होता हमीरसिंहाचा मुलगा करणीसिंह आणि वधू होती कानोता (जयपूर)चे ठाकूर मानसिंह यांची मुलगी पद्मिनी. 


पुढील स्लाईडमध्ये वाचा, मोदींबद्दल काय म्हणाले होते हमीरसिंह..   

 

बातम्या आणखी आहेत...