Home | Sports | From The Field | RR won the match against MI

आयपीएल-१२ : मुंबई २०० वा टी-२० सामना खेळणारा पहिला संघ, राेहितच्या नेतृत्वात मुंबईचा १०० वा सामना; राजस्थानची तिसऱ्यांदा मात

वृत्तसंस्था | Update - Apr 14, 2019, 09:38 AM IST

राजस्थान राॅयल्स ४ गड्यांनी विजयी; यजमान मुंबईचा तिसरा पराभव

  • RR won the match against MI

    मुंबई - अजिंक्य रहाणेच्या राजस्थान राॅयल्स संघाने शनिवारी १२ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला पराभूत केले. राजस्थान संघाने १९.३ षटकांत ४ गडी राखून लीगमधील सातवा सामना जिंकला. यासह राजस्थान टीमचा मुंबईविरुद्धचा हा सलग तिसरा विजय ठरला. यासह राजस्थान संघाने दुसऱ्या विजयाची नाेंद केली. तसेच मुंबईला तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. हा मुंबई इंडियन्सचा २०० वा टी-२० सामना हाेता. अशा प्रकारे झटपट क्रिकेटच्या छाेट्या फाॅरमॅटमध्ये सामन्यांचे द्विशतक साजरे करणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला.

    प्रथम फलंदाजी करताना यजमान मुंबई इंडियन्स संघाने अापल्या घरच्या मैदानावर ५ बाद १८७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने सहा गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. संघाच्या विजयासाठी कर्णधार अजिंक्य रहाणेसह (३७) जाेस बटलर (८९) आणि संजू सॅमसनने (३१) महत्त्वाची खेळी केली.बटलर अाणि संजू सॅमसनने झंझावाती खेळी करताना दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली.

    नेतृत्वात शतक; राेहित चाैथा कर्णधार :

    राेहितच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने टी-२० सामन्यांचे शतक साजरे केले. त्याच्या नेतृत्वात हा मुंबईचा १०० वा सामना हाेता. नेतृत्वाचे शतक झळकावणारा राेहित हा चाैथा कर्णधार ठरला. यामध्ये महेंद्रसिंग धाेनी (१६६), गाैतम गंभीर (१२९), काेहली (१०२) यांचाही समावेश आहे.

Trending