Home | Business | Personal Finance | RRC Recruitment: 100000 Government Jobs Opening at RRC Level 1, Apply Here Now

RRB RRC Recruitment 2019: रेल्वेत निघाल्या 1.30 लाख नोकऱ्या, 10th वी पासपासून ग्रॅजुएट्सपर्यंत करू शकता अर्ज; मिळेल सातव्या वेतन आयोगासह सॅलरी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 23, 2019, 03:04 PM IST

ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया 28 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

 • RRC Recruitment: 100000 Government Jobs Opening at RRC Level 1, Apply Here Now

  युटिलिटी डेस्क - रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने करीब जवळपास 1.30 लाख नोकऱ्या काढल्या आहेत. नुकतेच जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, नोकऱ्यांसाठी 10 वी, 12 वी पास, ITI होल्डर, डिप्लोमा आणि ग्रॅजुएट्स उमेदवार असे सगळेच अर्ज दाखल करू शकतील. यामध्ये नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी (NTPC), पॅरा मेडिकल स्टाफ, मिनिस्ट्रियल अॅन्ड लेव्हल-1 अशा एकूण 1 लाख 30 हजार पदांची भरती केली जाणार आहे. या सर्वच जागांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया 28 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.


  वर्गनिहाय RRB व्हॅकेन्सी
  RRC-01/2019 : लेव्हल-1 पोस्ट => ट्रॅक मेंटेनर, हेल्पर, असिस्टंट पॉइंट्स-मन
  RRB/CEN01/2019 : नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी => व्हॅरियस क्लर्क, टायपिस्ट, कमर्शियल अप्रेंटिस, स्टेशन मास्टर
  RRB/CEN02/2019 : पॅरा मेडिकल स्टाफ => स्टाफ नर्स, हेल्थ अॅन्ड मलेरिया इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, ECG टेक्निकल
  RRB/CEN03/2019 : मिनिस्ट्रियल अॅन्ड आयसोलेटेड कॅटेगरी => स्टेनोग्राफर, जुनियर ट्रान्सलेटर, चीफ लॉ असिस्टंट


  वयोमर्यादा: 1 जुलै 2019 तारखेच्या आधारावर RRBs आणि RRCs च्या नियमानुसार सूट दिली जाईल.


  वेतन आणि भत्ते: सर्वच पदांसाठी वेग-वेगळे वेतन आणि भत्ते मिळतील. हे सर्वच वेतन सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार दिले जातील.


  अॅप्लिकेशन फी: जनरल आणि OBC वर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये, SC / ST / एक्स-सर्व्हिसमन / PwBDs / फीमेल / ट्रान्सजेंडर / मायनॉरिटी / आर्थिक मागास उमेदवारांना 250 रुपये फी आकारली जाईल.


  निवड प्रक्रिया: कॉम्प्यूटर बेस्ड टेस्ट (CBT)


  आवश्यक तारखा
  RRC लेव्हल-1 पोस्ट: ऑनलाइन रेजिस्ट्रेशन ओपनिंग डेट 12/03/2019 सकाळी 10 वाजता
  RRB NTPC 2019 : ऑनलाइन रेजिस्ट्रेशन ओपनिंग डेट 28/02/2019 सकाळी 10 वाजता
  RRB पॅरा मेडिकल स्टाफ: ऑनलाइन रेजिस्ट्रेशन ओपनिंग डेट 08/03/2019 सकाळी 10 वाजता
  RRB मिनिस्ट्रियल अॅन्ड आयसोलेटेड कॅटेगरी: ऑनलाइन रेजिस्ट्रेशन ओपनिंग डेट 08/03/2019 सकाळी 10 वाजता


  रेल्वेची अधिकृत नोटिफिकेशन वाचण्यासाठी यावर क्लिक करा

Trending