• Home
  • News
  • Rs 2 lakh is spent on the makeup of actress Shreenu Parikh ek bhram sarvagunn sampann

TV / टीव्ही शोमध्ये बदलला लूक, अभिनेत्री श्रेनू पारिखच्या फक्त मेकअपवर खर्च होत आहेत 2 लाख रुपये

पडद्यावर मॉर्डन लूकसाठी वाढला प्रॉडक्शनचा खर्च 

दिव्य मराठी वेब

Jun 24,2019 01:56:00 PM IST

श्रेनूच्या मेकअपसाठी महिन्याला २ लाख रुपये खर्च येतो टीव्ही अभिनेत्री श्रेनू पारिख सध्या 'एक भ्रम सर्वगुण संपन्न' मध्ये वेगळ्याच रूपात दिसत आहे. शोमध्ये श्रेनू आतापर्यंत बनारसी साडी आणि मेकअपमध्ये दिसत होती आता तिचा लूक बदलण्यात आला आहे. या लूकसाठी बराच पैसा खर्च होत आहे. तर जाणून घेऊया तिच्या मेकअपवर किती पैसा खर्च होतो.


पडद्यावर मॉर्डन लूकसाठी वाढला प्रॉडक्शनचा खर्च
श्रेनूचा लूक बदलल्यामुळे प्रॉडक्शन हाऊसला आता महिन्याकाठी ७५ ते ८० हजार रुपये जास्त खर्च करावा लागतो. मालिकेशी जोडलेल्या एका सूत्रांनी सांगितले..., पहिल्या दिवशी श्रेनूला भारतीय लूक देण्यात आला होता. यात बनारसी साडी, गडद मेकअप, दागिने घालून तिला पडद्यावर आणले होते. आता निर्मात्यांनी मालिकेची कथा बदलली आहे. यात श्रेनू ट्रेडिशनल लूकच्या एेवजी मॉडर्न बॉसच्या लूकमध्ये दिसत आहे. या लूकसाठी तिच्या मेकअप टीमला आधीच आदेश देण्यात आाल होता. त्यामुळे त्यांनी अापली कास्टिंग वाढवली. या लूकसाठी तिचे मेकअप प्रॉडक्ट्स बदलण्यात अाले होते. त्यामुळे खर्च वाढला. दरदिवशी श्रेनूच्या मेकअपवर कमीत कमी ५ ते ६ हजार रुपये खर्च येत होता. मात्र आता याचा खर्च वाढून तो ७ ते ८ हजार झाला आहे. यामुळे मालिकेला चांगला प्रतिसाद मिळेल असा निर्मात्यांना विश्वास आहे.


मालिकेत लीप आल्यामुळे मेकअपमध्ये बदल झाला
प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट किशोर सावंत सांगतात...,जेव्हा कथेत बदल येतो तेव्हा सर्वात आधी कलाकारांचा लूक बदलण्यात येतो. टीव्ही मालिकेत लीप आणण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अशावेळी अनेक कलाकारांना वयस्कर दाखवावे लागते. यासाठी अनेक प्रकारच्या तंत्राचा वापर करण्यात येतो. अशावेळी खर्चदेखील वाढतो. कारण मेकअप प्रॉडक्ट्स बदल जाते आहे. खरं तर, टीव्ही अभिनेत्रीचे मेकअप काॅस्ट जवळजवळ १५०० ते २००० रोज असतो. यापेक्षा जास्त येत नाही.


मेकअपवर दर महिन्याला १.५ ते २ लाख खर्च होतो
श्रेनू महिन्यातून २५ दिवस शूटिंग करते. यावर जवळजवळ १.५ ते २ लाख खर्च येतो. याविषयी श्रेनु ासांगते..., साडीच्या लूकला चांगली पसंती मिळते. कारण त्या लूकसाठी मला डायटिंग करावी लागत नाही. भारतीय लूक नेहमी चांगला दिसतो. हा एका प्रकारे मला सुखद धक्का आहे. या लूकमध्ये मी श्रेणू सारखे राहायला आवडते.

X
COMMENT