आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एक बँक घोटाळा, 5383 कोटी बुडवून उद्योगपती नायजेरीला फरार झाल्याची शक्यता, कुटुंबासह केला पोबारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातची फार्मा कंपनी स्टर्लिंग बायोटेकचे मालक नितीन जयंतीलाल संदेसरा कुटुंबासह यूएईहून फरार झाल्याची माहिती मिळतेय. संदेसरा यांच्यावर भारतीय बँकांचे 5,383 कोटींचे कर्ज आहे. तपास संस्थांना 15 ऑगस्टला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली होती. पण आता ते दुसऱ्या देशात पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. हा देश नायजेरीया असू शकतो. या देशाबरोबरही भारताचा प्रत्यार्पणाचा करार नाही. 


नायजेरियातही कंपन्या 
> बँकेची फसवणूक केल्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते यूके आणि नायजेरियामध्येही संदेसर यांच्या कंपन्या आहेत. ते यापैकी कोणत्याही देशात असू शकतात. 
> सीबीआयने यूएईच्या एजन्सीजना नितीन यांच्या प्रकरणाची माहिती देत त्यांना अटक करण्याची विनंती केली होती. अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने परराष्ट्र मंत्रालयाकडे प्रत्यार्पणाची मागणीही केली होती. 
> पण संदेसरा यांना अटक झाली तेव्हा त्यांना यूएईतील दुसऱ्या एका प्रकरणात अटक झाली होती असे समोर आले आहे. भारताशी संबंधित प्रकरणी कारवाई झालेली नाही. 
> नितीन आणि त्यांचे चुलत भाऊ चेतन संदेसरा वडोदराच्या स्टर्लिंग बायोटेक कंपनीचे डायरेक्टर आहेत. कंपनीने बँकांकडून 5,383 कोटींचे कर्ज घेतले. नंतर ते एनपीए बनले. 
> आंध्र बँकेच्या नेतृत्वातील कंसोर्शियमने स्टर्लिंग बायोटेकला लोन दिले होते. या प्रकरणी नेते आणि अधिकाऱ्यांची मिलिभगत असल्याचे समोर आले आेह. 
> सीबीआयने ऑक्टोबर 2017 मध्ये संदेसरा ब्रदर्स विरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून दोघे फरार आहेत. अंमलबजावणी संचलनालय त्यांच्या विरोधात मनी लाँडरिंगची चौकशीही करत आहे. 
> सीबीआयने नितिन यांच्या कुटुंबातील दीप्ती संसेदरा यांच्यासह इतरांवरही गुन्हे दाखल केले आहेत. त्यात स्टर्लिंग बायोटेकचे  डायरेक्टर राजभूषण ओमप्रकाश दीक्षित, विलास जोशी, चार्टर्ड अकाऊंटंट हेमंत आणि आंध्र बँकेचे माजी संचालक अनूप गर्ग यांचा समावेश आहे. 
> दीक्षित आणि गर्ग यांना ईडीने जूनमध्ये अटक केली. या प्रकरणी दिल्लीचे व्यावसायिक गगन धवनलाही अटक झाली आहे. तसेच स्टर्लिंग बायोटेकची 4,700 कोटींची मालमत्ताही अटॅच करण्यात आली आहे. 
> सीबीआयच्या आरोपानुसार स्टर्लिंग बायोटेकच्या संचालकांनी कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेरा फेरी केली. तसेच बनावट कागदपत्रे तयार करून बॅलेन्स शीटमध्ये घोटाळा केला. 
> कंपनीचे मार्केट कॅपही चुकीचे सांगितले. टर्नओव्हर आणि टॅक्स भरण्याबाबतच्या आकड्यांतही फरक होता. संदेसरा भावंडांनी दुबई आणि भारतात 300 हून अधिक बेनामी कंपन्यांच्या मदतीने हेरा फेरी केली होती. 
> 31 मार्च 2008 ला संपलेल्या आर्थिक वर्षात 50 कोटींची खरेदी केली पण खात्यात फक्त 405 कोटी दाखवले. 2007-08 चा टर्नओव्हर 304.8 कोटी राहिला. पण आयटी रिटर्न आणि बॅलेन्स शीटमध्ये 918.3 कोटींच्या टर्नओव्हरची माहिती होती. 
> सीबीआयच्या मते स्टर्लिंग बायोटेकमध्ये मनी लाँडरींग आणि इनसायडर ट्रेडींग सुरू होते. संदेसरा फॅमिलीने अनुप गर्गला कुरिअरद्वारे अनेकदा पैसे पाठवले.

बातम्या आणखी आहेत...