आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भावस्था दाखवणाऱ्या 14 शिल्पांवर 5500 कोटी खर्च, लाेकांमध्ये नाराजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोहा - कतारमध्ये महिला रुग्णालयाच्या परिसरात आरोग्य विभागाने गर्भावस्थेचे विविध टप्पे दाखवणाऱ्या १४ शिल्पे बसवली आहेत.  ही शिल्पे ४६ फूट उंच आहेत. गर्भधारणेपासून मुलाच्या जन्मापर्यंतच्या अवस्था यात दर्शवल्या आहेत. लोकांना गर्भावस्थेची माहिती व्हावी, असा यामागचा उद्देश होता. आरोग्य विभागाने या प्रकल्पावर ८ बिलियन डॉलर (सुमारे ५५,०५० कोटी रुपये)खर्च करण्यात आले आहेत.पण लोकांना ही शिल्पे आवडलेली नाहीत. त्यावरून देशात टीकेची झाेड उठली आहे.

 

अशा प्रकारची शिल्पे देशात नको, असे त्यांचे मत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार,  ऑक्टोबर २०१३ मध्ये इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने त्या झाकून ठेवलेल्या होत्या. नंतर गेल्या आठवड्यात रुग्णालयाचे उद््घाटन झाले. शिल्पांवरील आवरण काढण्यात आले.  यानंतर  साेशल मीडियावर तेथील लोकांनी सरकारच्या धाेरणांवर  टीका करत आरोग्य विभागास धारेवर धरले. 

 

शिल्पकार म्हणाले, २०१३ मध्येच झाला असता वाद

शिल्पकार ब्रिटिश कलावंत डॅमियन हिल्ट यांनी सांगितले , ‘२०१३ मध्येच शिल्पे तयार केल्यानंतरटीका झाली असती. पण रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याने वाद टळला. मिडल ईस्टच्या इतिहासात आरोग्यावर जनजागृती करणारी पहिलीच शिल्पे आहेत. गेल्या आठवड्यात शिल्पावरील आवरणे काढली. सरकारच्या कतार फाउंडेशनच्या आर्ट स्पेशालिस्ट लायला यांनी महिलांमध्ये जागृतीसाठीचा प्रयत्न असल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...